breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus : पुणे मनपा आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्यात सामंजस्य करार

पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनावर मात करण्यासाठी पुणे महापालिका आणि लता मंगेशकर मेडिकल फौडेशनचे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्यामध्ये ‘सामंजस्य करार’, झाला आहे. त्यामुळे आता नव्याने 280 बेड्सची सोय उपलब्ध होणार आहे.

हा करार करण्यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीने आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकतीच मान्यता दिलेली होती. या करारावर पुणे महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल व दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वतीने विश्वस्त व वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी सह्या केल्या. याप्रसंगी पुणे मनपाच्या सहाययक आरोग्यप्रमुख डॉ. अंजली साबणे, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. भट उपस्थित होते. या करारानुसार शहरातील व पुणे मनपाने शिफारस केलेले पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक रुग्ण यांच्या उपचाराकरिता रुग्णालयात 125 बेड व अतिदक्षता विभागातील 15 बेड आरक्षित करण्यात येतील. शासनाच्या योजनेनुसार रुग्णालय उपचार करणार आहेत.

या व्यतिरिक्त 125 बेड आयसोलेशन करिता व 15 बेड आयसीयु करिता आरक्षित करण्यात येतील. रुग्णास डिस्चार्ज दिल्यानंतर येत्या तीन महिन्यांत पुणे मनपाच्या वतीने बिलांची पूर्तता केली जाईल. रुग्ण दाखल झाल्यानंतर सर्व जबाबदारी रुग्णालयाची राहील. रुग्णालयास आवश्यकतेनुसार पीपीई किट्स, एन – 95, मास्क वितरित करण्यात येतील, असे पुणे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button