शिवसेनेचे चेतन बेंद्रे व समीर जावळकर यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
मिशन- PCMC : प्रभाग 15 मध्ये घरोघरी प्रचारात युवा उमेदवारांचा सक्रिय सहभाग

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुक प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रभाग क्र. १५ मध्ये शिवसेना पक्षाचे उमेदवार समीर दिलीप जावळकर (‘अ’) आणि चेतन गौतम बेंद्रे (‘ड’) यांनी दारोदारी प्रचाराला वेग दिला असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
संपूर्ण प्रभागात युवाशक्तीने प्रेरित या उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटी, सोशल मीडिया व विविध माध्यमांचा उपयोग करून मतदारांपर्यंत आपली पोहोच वाढवली आहे. स्थानिक नागरिकांचा अनुभव असा आहे की, दोघेही सुशिक्षित, सुसंस्कृत आणि कार्यदक्ष असून त्यांनी देशाच्या लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला आहे.
हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी खूषखबर…! पीएम किसानचा २२ वा हप्ता लवकरच मिळणार…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण योजना तसेच तत्परतेमुळे नागरिकांची पसंती असून, त्यांच्या उमेदवारांबद्दलही प्रभागातील मतदारांनी सकारात्मक अभिप्राय व्यक्त केला आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे चेतन बेंद्रे आणि समीर जावळकर या दोघांचेही प्रचारातील प्रयत्न चर्चेत आले आहेत.
चेतन बेंद्रे म्हणतात, “लोकशाही ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रभागातील प्रत्येक मतदाराशी संवाद साधून त्यांच्या गरजा समजून घेणे आणि त्यावर काम करणे हेच माझे प्राथमिक ध्येय आहे.” विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, प्रभागातील या सक्रिय प्रचारामुळे शिवसेना पक्ष या निवडणुकीत बाजी मारण्याची शक्यता आहे.




