Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीच्या तलावातील जलसृष्टी संवर्धनासाठी पुढाकार!

भाजपा नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांची ‘व्हीजिट’

– मासे मृत्यूबाबत नागरिकांची तक्रार; पाणी तपासणीचे निर्देश

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या मागे असलेल्या एसीटीपी (STP) प्रकल्पातून प्रक्रिया केलेले पाणी भोसरी सहल केंद्र परिसरातील तलावात सोडले जाते. या पाण्यामुळे तलावातील मासे मृत पावत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, प्रशासनाला पाणी तपासणीचे निर्देश दिले आहेत.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यकारी अभियंता सोहम निकम, उपअभियंता प्रिती गाडे, कनिष्ठ अभियंता दशरथ वाघोले उपस्थित होते. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत संबंधित विभागाला तलावातील पाण्याची तातडीने तपासणी (Water Testing) करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच तलावाच्या पर्यावरणीय स्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

हेही वाचा –  “संधी साधून महाविकास आघाडीत गेलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश नाही”, रवींद्र चव्हाण यांचा ठाम इशारा

दरम्यान, कोणत्याही प्रकारचे शिळे अन्न अथवा खराब अन्न पदार्थ तलावातील माशांना देऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढू नये आणि जलचर जीवांचे संरक्षण व्हावे, असा उद्देश व्यक्त करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर स्थानिक पातळीवर जनजागृती वाढत असून, नागरिकांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रशासनाने अधिक कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.

या विषयावर भाजपा नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांनीही लक्ष केंद्रित करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. परिसरातील पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी आणि तलावातील जैवविविधता सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यावर भर दिला जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

भोसरीतील सहल केंद्रातील तलावात काही मासे मृत पावत असल्याच्या तक्रारींनंतर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पाणी तपासणीचे निर्देश देण्यात आले असून परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष आहे. नागरिकांनी चिंता करू नये. तलावातील पाण्याची सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे. अहवाल आल्यानंतर आवश्यक ती तातडीची कार्यवाही केली जाईल. परिसरातील पर्यावरण व जलचरांचे संरक्षण हे आमचे प्राधान्य आहे.प्रशासनाकडून तलाव परिसरात निरीक्षण वाढविण्यात आले असून कोणतेही शिळे अन्न माशांना देऊ नये, अशा सूचना पुन्हा देण्यात आल्या आहेत.

– प्रा. सोनाली गव्हाणे, नगरसेविका, भाजपा.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button