breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून उद्धव ठाकरेंनी राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली’,- चंद्रकांत पाटील

मुंबई |

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक झाल्यानंतर आता भाजपने शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक सचिन वाझे यांचा बचाव का केला?, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला आहे. एनआयएने दहशतवादी कटात अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कालपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. एका कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असे त्यांना वाटत नाही का?, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक सचिन वाझे यांचा बचाव का केला? हे समजण्यापलीकडचे आहे. आपल्या लोकशाही व्यवस्थेत कोणताही राजकीय पक्ष प्रथम आपल्या संविधानाशी निष्ठा बाळगतो आणि नंतर जनतेचा पाठिंबा मिळवतो, परंतु येथे उद्योगपतींच्या घातपाताची व समाजातील शांतता भंग करणाऱ्यांचे शिवसेना समर्थन करत होती.

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ज्याची उत्तरे महाराष्ट्राची जनताही शोधत आहे. वाझे यांचे समर्थन का केले जात होते? कोणते मंत्री, आमदार आणि राजकीय नेत्यांना या संपूर्ण घटनेची कल्पना होती आणि तरीही त्यांनी मौन बाळगले? कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना हे सर्व माहित होते आणि तरीही त्यांनी मौन बाळगले?, असे अनेक प्रश्न चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केले आहेत. हे केवळ हत्येचे प्रकरण नाही, तर हा देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट होता. ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी संशयास्पदरित्या सहभागी होता. पण जनतेला महाराष्ट्र पोलिस, मुंबई पोलिस आणि एनआयएवर पूर्ण विश्वास आहे आणि ते याप्रकरणाचा तपास करुन खऱ्या सूत्रधाराला अटक करुन या प्रकरणाचा लवकरच पर्दाफाश करतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

वाचा- सचिन वाझेंना पोलीस दलात घेण्यासाठी शिवसेनेने माझ्याकडे आग्रह केला होता, फडणवीसांचा गौप्यस्फोट

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button