Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

एकनाथ शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के ? शिंदेंनी ठाकरेंचा शिलेदार फोडला

अकोला : एकनाथ शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे  यांना धक्क्यांवर धक्के दिल्या जात आहेत. अकोल्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अकोल्याचे माजी विधान परिषद आमदार गोपीकिशन बाजोरिया  आणि त्यांचे सुपुत्र विद्यमान विधान परिषद आमदार विप्लव बाजोरिया  यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बाजोरिया शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आज बाजोरियांनी शिंदे गटात अधिकृत प्रवेश घेतला. शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात हा प्रवेश झाला. दरम्यान, त्यांच्या प्रवेशानंतर जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया समोर येत आहे.

अकोल्यात शिवसेनेला खिंडार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेसमोर अनेक आव्हाने समोर येत आहे, दररोज शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक, जिल्ह्याचे प्रमुख नेते शिंदे गटात सहभागी होतं आहे. आता अकोल्यातून शिवसेनासह युवा सेनेला धक्का बसला आहे. मुंबई येथे अकोल्यातील माजी आमदारांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये विधान परिषद माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, हिंगोली परभणीतील शिवसेनेचे विद्यमान विधानपरिषद आमदार विप्लव बाजोरिया, उपशहर प्रमुख, युवा सेनेचे अकोला जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप, माजी नगरसेवकांसह इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यामुळ आता अकोला जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार असल्याची शक्यता आहे. अकोल्यात सुरुवातीपासून जिल्हाप्रमुख तथा शिवसेना आमदार नितीन देशमुख व माजी आमदार गोपिकिशन बाजोरीया, माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचे गट असल्याची चर्चा नेहमीच रंगली होती. पण बाजोरीया गटांकडून अनेकदा विद्यमान आमदार नितीन देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते.

दरम्यान, बाजोरीया यांचे समर्थक मानले जाणारे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, माजी नगरसेवक संतोष अनासने यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी सद्यस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या सेनेत राहणे पसंत केलं.

नेमके काय आहेत देशमुखांवर आरोप?

शिवसेनेचे अकोल्याचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी अनेकदा विद्यमान शिवसेना जिल्हाप्रमुख तथा बाळापुर मतदारसंघाचे शिवसेना आमदार नितिन देशमुख यांच्यावर आरोप केले होते. अकोल्यात शिवसेना संपवण्यासाठी देशमुख हे भाजपला नेहमीचं मदत करतात, याबाबत अनेक तक्रारी पक्ष प्रमुखांकडे केल्या. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याचे त्यांनी म्हटलं होतं. अकोला शिवसेनेतील वादाला विधान परिषद निवडणुकीतील पक्षाच्या लाजिरवाण्या पराभवाची किनार आहे, आमदार नितीन देशमुखांच्या दगाफटक्यांनीच तीनदा आमदार राहिलेल्या गोपीकिशन बाजोरियांचा पराभव झाल्याचा बाजोरिया गटाचा आरोप होता.

आमदार देशमुख भाजपशी संधान सांधत जिल्ह्यात शिवसेना पक्ष‍ संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा बाजोरिया गटाचा आरोप होता. माजी सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र दिलं होतं. यात हे आरोप करण्यात आले होते. मात्र, देशमुखांनी सहसंपर्कप्रमुखांचे आरोप फेटाळलून लावले होते. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अकोला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या. विशेष बाब म्हणजे थेट शिवसेना पक्षप्रमुखांना पत्र लिहून आमदार देशमुखांवर गंभीर आरोप करणारे श्रीरंग पिंजरकर यांना सहसंपर्क प्रमुख पदावरून हटवलं होतं. तेव्हापासून बाजोरिया गटांमध्ये पक्ष प्रमुख ठाकरेंवर नाराजी असल्याचे बोलले जाते.

बाजोरियांनी आता कोणत्याही वार्डात उभं राहावं : मालोकार

अकोल्यात शिवसेनेला धक्का देण्याचं कट रचल्या जातंय. अनेक शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, नगरसेवक याला बळी पडताहेत. एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहे. दरम्यान, आता बाजोरियांनी विधानसभा तर दूरचा विषय, आगामी महापालिका निवडणुकीत त्यांनी कोणत्याही मनपाच्या वार्डात उभं राहावं आणि निवडून दाखवावं, असं थेट आव्हान शिवसेना नेते विजय मालोकार यांनी केलं. मूळ तर बाजोरिया यांचा शिवसेना पक्षाला गेल्या १८ वर्षांत कोणताही फायदा झाला नाही, आतापर्यंत बाजोरिया यांनी स्वतःचा फायदा जरूर केला. बाजोरिया यांची प्रतिमा स्वार्थी म्हणून झाली आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळ बाजोरिया यांच्यासोबत जाणाऱ्या शिवसैनिकांनी त्यांची प्रतिमा बाजोरिया सारखी करून घेऊ नये. अन् स्वतःचं नुकसान करून घेवू नये, असेही बोलले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button