ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

साफसफाईच्या निवीदेसाठी बनावट बॅंक गॅरंटी आणि प्रमाणपत्र सादर करणा-या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड | साफसफाईच्या निवीदा मिळवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला, बनावट बॅंक गॅरंटी आणि प्रमाणपत्र सादर करणा-या इसमाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत हा प्रकार घडला.सिक्युअर आयटी, फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीचे रविराज चंद्रकांत लायगुडे यांच्या विरोधात विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आनंद जगन्नाथ गायकवाड (वय 55, रा. तळजाई पठार, शिवाजीनगर, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 50 कोटींची साफसफाईची निवीदा मिळवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला, बनावट बॅंक गॅरंटी आणि प्रमाणपत्र सादर केले. दाखल फिर्यादी वरुन फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button