breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर एकेरी प्रवासाचे टोल भाडे ११०० रुपये

नागपूर – मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग कामाला कोरोनामुळे विलंब झाला असला तरी तब्बल ५५ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे शिर्डीपर्यंतच्या मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शुक्रवारी नागपुरात केला. यावेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या कमी वजनाच्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी ११०० रुपये टोल द्यावा लागेल, अशी माहिती एमएसआरडीडीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांनी काल शुक्रवारी दुपारी समृद्धी महामार्गाच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अनिल कुमार गायकवाड, निशिकांत सुखे, आमदार आशिष जयस्वाल, शिवसेना नेते किरण पांडव हे उपस्थित होते. यावेळी गायकवाड यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या २००८ मधील मार्गदर्शक सूचनांनुसार टोल स्वीकारला जाणार आहे. कमी वजनाच्या वाहनांसाठी १.६५ रुपये प्रति किमी इतका टोल आकारण्यात येणार आहे. तर अवजड वाहनांसाठी हा टोल तीनपट असेल. या मार्गावरील वाहने प्रतितास १५० किमी वेगाने धावतील. या संपूर्ण प्रकल्पाचे ७० टक्के तर शिर्डीपर्यंत ७९ टक्के काम झाले आहे. या कामावर ३५ हजार कामगार आणि ५५०० मशिन्स कार्यरत आहेत, असे गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button