ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जबरी चोरीप्रकरणी सात महिन्यांनी गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड | मित्रासोबत रस्त्याने पायी चाललेल्या तरुणाच्या हातातील मोबाईल दुचाकीवरील चोरट्याने हिसकावून नेला. ही घटना 8 फेब्रुवारी रोजी सकाळी इंद्रायणी नगर, भोसरी येथे घडली. याप्रकरणी तब्बल सात महिन्यांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुनेशराहुल सुरेंद्रकुमार पात्रा (वय 21, रा. सहारा सिटी, खराबवाडी, पुणे) यांनी शनिवारी (दि. 21) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील एका अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पात्रा हे इंद्रायणी नगर कॉर्नर कडून भोसरीकडे आपला मित्र सुरज कुमार पटनाईक यांच्या 8 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रस्त्याने पायी चालले होते. त्यावेळेस दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या जवळ मोटारसायकल थांबवली. फिर्यादी पात्रा यांच्या हातातील 12 हजार रुपये किमतीचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button