breaking-newsताज्या घडामोडीपुणे

खासदार अमोल कोल्हेंकडून आंबेगाव समस्यांची केली पाहणी

शिरुर – शिरूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे-नाशिक रोडवरील खेड घाटामधील समस्या, ट्रॅफिक समस्या या संदर्भात अधिकाऱ्यांना समवेत आज सकाळी घाटाची पाहणी केली. पुणे-नाशिक ट्राफिक समस्या ही दिवसेंदिवस वाढत चालली असून याकडे कदापि दुर्लक्ष करून चालणार नाही लवकरात लवकर ट्राफिक समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचं डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितले.

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आज डॉ. कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या खासदारांसमोर मांडल्या माजी खासदार आढळराव यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता अधिकारी वर्गास सोबत घेऊन जमीन अधिग्रहित केली, तसेच स्वार्थासाठी व स्वतःची जमीन वाचवण्यासाठी हा शेतकऱ्यांच्या जमिनी घालवल्या असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button