breaking-newsताज्या घडामोडीपुणे

राज्यात तेरा ठिकाणी एकाच दिवशी ढगफुटी

पुणे –  राज्यात गुरुवारी एकाच दिवशी तब्बल 13 ठिकाणी ढगफुटी झाली. आजपर्यंत एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर ढगफुटी झाली. आजवरचा हा उच्चांक असल्याचे हवामानतज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

जोहरे हे पुणे तेथील आयआयटीएम या हवामान विभागातील मुख्य प्रयोग शाळेतील माजी भौतिक शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या दाव्यानुसार रडारची संख्या ग्रामीण भागात कमी असल्याने ढगफुटी मोजताच येत नाही. मात्र, 1 मिनिटात 25 मि.मी., अर्ध्या तासांत 50 मि.मी. किंवा एका तासांत 100 मिलीमीटर पाऊस झाला तर त्याला जागतिक हवामान संघटनेच्या मापकानुसार ढगफुटी घोषित केले जाते. त्यामुळे राज्यात गुरुवारी 13 पेक्षा जास्त ठिकाणी एकाच दिवशी ढगफुटी झाली आहे.

जोहरे यांच्या म्हणण्यानुसार पुणे येथील आयआयटीएम संस्थेतील महासंगणकावर त्यांची मोजणी करता येते. मात्र, राज्यातील मुंबई, पुणे वगळता इतरत्र रडारची संख्या कमी असल्याने ढगफुटीच मोजता येत नाही. ढगफुटी ही लपवली जात आहे. त्याला अतिवृष्टी असे नाव दिले जात आहे. राज्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी 14 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचे बजेट आहे.

एक रडार 40 कोटीं रुपयांचे आहे.राज्यातील 358 तालुक्यांत वर्षाला एक रडार बसवले. तर, 14 हजार 326 कोटी इतका खर्च येतो. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने राज्यात ढफुटी झाल्यावरच आपत्ती व्यवस्थापनावर मोठा खर्च होतो शिवाय जीवितहानी होते ती वेगळीच. रडार बसवले तर हे टाळता येईल, असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button