breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाल्हेकरवाडी दवाखान्याच्या धोकादायक इमारतीत ओपीडी सुरु

महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे दुर्लक्ष; इमारत पाडून दवाखान्याची पर्यायी व्यवस्था करा

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या वाल्हेकरवाडी दवाखान्याची इमारत धोकादायक बनली आहे. त्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडीट झाल्यानंतर इमारत तात्काळ जमिनदोस्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, साडेतीन वर्ष उलटूनही त्याच धोकादायक इमारतीत दवाखान्याची ओपीडी सुरु असून त्याकडे स्थापत्य विभागाच्या अधिका-यांना दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, ती इमारत तात्काळ पाडून दवाखाना अन्यत्र स्थलांतर करावा, अशी मागणी नगरसेविका मोनाताई कुलकर्णी यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाल्हेकरवाडी येथे महानगरपालिका इमारतीत दवाखाना सुरु केलेला आहे. त्या दवाखान्यातील ओपीडीत दररोज किमान शंभर ते दोनशे रुग्ण औषधोपचार घेत आहे. या दवाखान्यामुळे रुग्णांची सोय झाली आहे. परंतू, सदरील दवाखान्याची इमारत खुपच जीर्ण झाली असून त्या इमारतीच्या स्लॅपचे ढलपे ही निघू लागले आहेत.  

महापालिकेच्या वाल्हेकरवाडी दवाखान्याची इमारत सध्यस्थितीत धोकादायक बनलेली आहे. महापालिकेच्या स्थापत्य विभागाने सन 2016 मध्ये त्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडीट देखील केलेले आहे. तसेच सदरील इमारत तात्काळ जमीनदोस्त करावी, असे म्हटलेले आहे. तरीही त्या दवाखान्याच्या इमारतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. सदरील इमारत धोकादायक असून त्या इमारतीकडे गेल्या साडेतीन वर्षात महापालिकेच्या स्थापत्य विभागातील अधिका-यांनी लक्ष दिलेले नाही.  

सदरील इमारत धोकादायक असतानाही स्थापत्य विभागाने इमारत पाडलेली नाही. तसेच दवाखान्यास पर्यायी जागा उपलब्ध केलेली नाही. भविष्यात त्या इमारतीमुळे जिवित अथवा वित्तीय हानी झाल्यास स्थापत्य विभागाचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील. याबाबत आयुक्तसाहेब स्वता आपण लक्ष घालून वाल्हेकरवाडी दवाखान्याच्या इमारतीबाबत तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा, अशीही मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button