breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी चिंचवडची प्रभाग रचना आमच्यासाठी अनुकूलच; सर्वपक्षीय नेत्यांना होरा

पिंपरी |

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली प्रभाग रचना आमच्यासाठी अनुकूलच आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत आम्हीच बाजी मारू असा होरा पिंपरी चिंचवड मधील भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचा आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रभाग रचनेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती.

  • कायदेशीर सल्ला घेणार- लांडगे

याबाबत भाजपाचे विद्यमान शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे म्हणाले की, २०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धती होती. त्यावेळी भाजपाला ७७ जागा मिळाल्या आहेत. आता तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार भाजपा गतवेळीपेक्षा जास्त जागा जिंकणार आहे. निवडणूक आयोग प्रशासनाकडून नियमाप्रमाणे प्रभाग रचना करण्यात आली आहे. तीन-चार ठिकाणी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी हस्तक्षेप करुन प्रभाग रचना असंवैधानिकपद्धतीने केल्याचे लक्षात आले आहे. याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेवून हरकती घेणार आहोत.

  • कामाचाच्या जोरावर चांगले यश मिळवणार- जगताप

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवडच्या विकासाच्या दृष्टीने भाजपाने चांगले काम केले आहे. भाजपाचे पदाधिकारी, संघटन आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. प्रत्येक प्रभागात दोन-तीन इच्छुक आणि प्रभावी उमेदवार केवळ भाजपाकडे आहेत. विरोधी पक्षाकडे अने क प्रभागांमध्ये उमेदवारही नाही. त्यामुळे निश्चितपणाने भाजपा केलेल्या कामाचाच्या जोरावर चांगले यश मिळवणार आहे.

  • महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच – वाघेरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, ”मागील पाच वर्षातील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्ट कारभाराला शहरातील जनता कंटाळली आहे. लोक निवडणुकीची वाट बघतच आहेत. आगामी निवडणुकीत 100 टक्के सत्तांतर होणार असून शहराचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल”.

  • मतदार जागा दाखवून देतील – कदम

काँग्रेसचे शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहराची निर्मिती ही काँग्रेसच्या विचारांनी झाली आहे. या शहरांमध्ये कॉंग्रेसला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आजही आहे. त्यामुळे प्रभाग रचना कोणी कशीही केली तरी यामुळे काँग्रेसला कुठलाही फरक पडणार नाही. या शहरातील कारखानदारी ही काँग्रेस पक्षाने आणली. काँग्रेसमधील जुन्या-जाणत्या नेत्यांच्या दूरदृष्टीने या शहराची भरभराट झाली. हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे प्रभाग रचना आणि त्याचा फायदा हे समीकरण काँग्रेसच्या बाबतीत लागू होणार नाही.स्वत:चे हित लक्षात घेऊन प्रभाग रचनेत हस्तक्षेप केला आहे. त्यांना शहरातील मतदार त्यांची जागा दाखवून देतील.

  • शिवसेनेचे नगरसेवक वाढलेले दिसतील – ॲड. भोसले

शिवसेनेचे शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले म्हणाले की 2022 ची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रभाग रचना शिवसेनेसाठी नक्कीच अनुकूल आहे. शिवसेनेच्या वतीने नुकत्याच अनेक ठिकाणी नियुकत्या करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेकडे सगळेच प्रभागांमध्ये उमेदवार आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच शिवसेनेचे प्रतिनिधी महानगरपालिकेमध्ये वाढलेले दिसणार आहेत.

  • प्रभाग रचना मनसेसाठी अनुकूलच – चिखले

मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले, प्रभाग रचना मनसेसाठी अनुकूल आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोष निर्माण झाला आहे. गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा मनसेचे उमेदवार निवडून येतील. त्यामुळे प्रलंबित कामे करण्याची चांगली संधी मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button