breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका पोटनिवडणुकीच्या हालचाली सुरू

  • निवडणूक आयोगाचे पुढील आठवड्यात आदेश मिळण्याची शक्यता

 

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका पोटनिवडणूक पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. याबाबत निवडणूक विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, असे संकेत आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर मुंबई आणि कोल्हापूर महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसोबतच राज्यातील महापालिकामधील पोटनिवडणूका घेण्यात येणार आहेत, असे म्हटले जात आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ताकाका साने, जावेश शेख आणि भाजपाचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे निधन झाले होते. त्यामुळे या तीन जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.

राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाचे महापालिकांसाठी एक सदस्य प्रभागपद्धती जाहीर केली असली तरी पोट निवडणूक ही चार सदस्यीय प्रभागपद्धतीनुसारच होणार आहे.

आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणूक वर्षभरावर आली आहे. प्रभाग रचना, आरक्षण सोडती, हरकती आणि आक्षेप आदी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शहरातील महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे रणशिंग लवकरच फुंकले जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button