breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मध्यप्रदेशातील काँग्रेस आमदार राहुल सिंह लोधींचा भाजपात प्रवेश

मध्यप्रदेशातील काँग्रेस आमदार राहुल सिंह लोधी यांनी रविवारी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. हंगामी अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती दिली.

मध्यप्रदेशातील 28 विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीला 8 दिवस राहिले असतानाच लोधी यांनी पक्षाला रामराम ठोकला. रविवारी सकाळी लोधी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर तासाभरातच ते भाजप कार्यालयात पोहचले. त्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला.

लोधी हे दामोह विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आले आहेत. भाजपचे जयंत मलैया यांचा त्यांनी पराभव केला होता. मध्यप्रदेशात आतापर्यंत 26 काँग्रेस आमदारांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेले आमदार हे जोतिरादित्य शिंदे यांचे समर्थक मानले जातात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button