ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

चिमुकल्या यश च्या शुभेच्छांनी गहिवरले आढळराव पाटील.. म्हणाले, ‘शहीदपुत्र यश च्या शिक्षणाची जबाबदारी माझी..!’

शहीद जवानाच्या मुलाने काय लिहिलं पत्रात?? आढळराव पाटील झाले भावूक..!

शिवाजीदादा मोठ्या भावाप्रमाणे माझ्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले : वीरपत्नी कौसल्या थोरात

“वंदे मातरम, बेस्ट ऑफ लक आजोबा” वीर जवान स्व. सुधीर थोरात यांच्या लहानग्या यश ने आढळरावांना दिल्या शुभेच्छा..!

पुणे : पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ सक्रिय राजकारणात असणारे त्याचबरोबर एक नव्हे दोन नव्हे तब्बल तीन वेळा लोकसभेचे खासदार म्हणून जनतेने निवडून दिलेले कणखर व कट्टर नेतृत्व म्हणून शिवाजी आढळराव पाटील यांना महाराष्ट्र ओळखतो. त्याच जोरावर ते यंदाची शिरूर लोकसभेची निवडणूक पुन्हा लढवत आहेत.

एक अभ्यासू, कणखर, आक्रमक, कृतिशील खासदार म्हणून शिवाजी आढळराव पाटील यांनी आजवर काम केले आहे, त्यातच नुकतेच निवडणूक प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने लौकी येथे देशाचे रक्षण करताना शहीद झालेले वीर जवान स्व. सुधीर पंढरीनाथ थोरात यांचा चिरंजीव कु. यश सुधीर थोरात या चिमुकल्याने आढळराव पाटील यांना लेखी पत्राद्वारे दिलेल्या शुभेच्छांनी कणखर मनाचे आढळराव देखील भावुक झाले..

मा. श्री. शिवाजीदादा आढळराव पाटील
शहिद जवान माझे पप्पा स्व. सुधीरजी पंढरीनाथ थोरात, देशाचे रक्षण करत असताना त्यांना वीरमरण आले. आपण एक कुटुंबप्रमुख म्हणून तुम्ही आमच्या सोबत राहिलात आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत, तुम्हाला जनतेची सेवा करण्याची पुन्हा संधी मिळो.
वंदे मातरम

Best of luck आजोबा..!
अशा शब्दांत यश थोरात या चिमूकल्याने आढळराव पाटील यांना लेखी शुभेच्छा दिल्या.

यावेळी ‘शिवाजीदादा खरच मोठ्या भावाप्रमाणे माझ्या मागे उभे राहिले, माझ्यावर माझ्या कुटुंबावर ज्यावेळी वेळ होती त्या वेळी मला भावासारखा आधार दिला हे मी कधी विसरू शकत नाही अशी भावना वीर माता सौ. कौसल्या पंढरीनाथ थोरात यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थितांसह शिवाजीराव आढळराव पाटील भावनिक झाले. जनतेचं हे प्रेम व आपुलकी पाहून मन गहिवरून आले, माझ्या जनतेचे हेच प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमी लढण्याची ऊर्जा देत राहते. यापुढे यशच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी माझी असा शब्द त्यांनी यावेळी वीरमाता कौसल्या थोरात यांना दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button