ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दरोडा घालणा-या टोळीचा म्होरक्या उत्तर प्रदेशला पळून जात असताना पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी चिंचवड | टपरी चालकाने गुंडांना खंडणीचा हप्ता देण्यास नकार दिला. त्या कारणावरून एका टोळक्याने टपरी चालक आणि त्याच्या दोन मित्रांना पिस्टलचा धाक दाखवून कोयत्याने वार करून सोन्याच्या साखळ्या दरोडा घालून लुटला.ही घटना 8 ऑगस्ट रोजी रात्री खेड तालुक्यातील भांबोली येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्केट चौकात घडली. या प्रकरणातील सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. टोळीचा म्होरक्या पत्नीसह उत्तर प्रदेश येथे पळून जात असताना महाळुंगे पोलिसांनी त्याला टिटवळा येथून अटक केली.

संतोष मधुकर मांजरे (वय 31, रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड) असे अटक केलेल्या टोळीच्या म्होरक्याचे नाव आहे. त्याच्यासह आकाश बाळासाहेब शेळके (वय 25, रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड), गणेश बबन डांगले (वय 20, रा. गवारवाडी, पाईट, ता. खेड), नारायण सुनील घावटे (वय 21, रा. शेलू, ता. खेड), गणेश हिरामण लिंभोरे (वय 20, रा. शेलू, ता. खेड), विठ्ठल नवनाथ पिकळे (वय 21, रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड), साईनाथ रामनाथ राऊत (वय 30, रा. भांबोली, ता. खेड) या साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

प्रदीप अरुण पडवळ (रा. बोरदरा, आंबेठाण, ता. खेड), सुमित भोकसे (रा. सरमकुंडी, ता. खेड) आणि अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.अक्षय किसन कोळेकर (वय 24) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय याची खेड तालुक्यातील भांबोली येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्केट चौकात पान टपरी आहे. ही पान टपरी चालू ठेवायची असेल तर प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये हप्ता दे अशी आरोपींनी अक्षय यांच्याकडे मागणी केली.

फिर्यादी अक्षय याने सराईत गुन्हेगार संतोष मांजरे याला हप्ता देण्यास नकार दिला. तसेच संतोष मांजरे याच्या विरोधक पार्टीचा सदस्य अनिल धोंडिबा निखाडे याला मदत केली. त्यावरून 8 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास सराईत गुन्हेगार आरोपी संतोष मांजरे याने त्याच्या नऊ ते दहा साथीदारांसह येऊन फिर्यादी अक्षय, त्याचे मित्र जीवन मधुकर पवार आणि सचिन ज्ञानदेव बोत्रे यांना पिस्टलचा धाक दाखवून लोखंडी कोयते आणि दांडक्याने डोक्यात, हातापायावर मारहाण करून गंभीर दुखापत केली.जीवन मधुकर पवार याच्या गळ्यातील 40 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, सचिन ज्ञानदेव बोत्रे याच्या गळ्यातील 20 हजारांची सोन्याची चेन असा एकूण 60 हजारांचा ऐवज आरोपींनी जबरदस्तीने दरोडा घालून लुटला. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. महाळुंगे पोलिसांनी या गुन्ह्यातील सहा आरोपींना अटक केली आहे.

या टोळीचा म्होरक्या संतोष मांजरे हा खुनासह मोक्काच्या गुन्ह्यात फरार होता. तो पत्नीसह उत्तर प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती महाळुंगे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी टिटवळा, ठाणे येथून अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने 23 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.अटक केलेल्या आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, तीन लोखंडी कोयते, चार लाकडी दांडके, तीन दुचाकी, एक सोन्याची चेन जप्त केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळींग, पोलीस कर्मचारी सागर पानमंद, चंदू गवारी, राजू जाधव, राजू कोणकेरी, नागेश माळी, संपत मुळे, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष काळे, श्रीधन इचके, हिरामण सांगडे, शरद खैरे, कल्याण पोलीस स्टेशनचे योगेश वाघेरे, दर्शन सावळे, नितीन बिशे यांच्या पथकाने केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button