breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन

मुंबई | देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) उद्रेक पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकही रस्त्यावर उतरत आहेत. सरकारने हा कायदा तत्काळ मागे घ्यावा म्हणून आज (19 डिसेंबर) देशभरात आंदोलने केली जात आहेत. महाराष्ट्रात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिक उत्स्फुर्तपणे एकत्र येत मोर्चात सहभागी होत आहेत. या सर्व धर्मीयांचा लाक्षणिक सहभाग दिसत आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी कायदा आणि विद्यार्थ्यांवरील हिंसक कारवाई याविरोधात मुंबईमध्ये मागील 2-3 दिवसांपासून सातत्याने आंदोलने होत आहेत. आजही टाटा इंस्टिट्युटच्या (टीस) विद्यार्थ्यांनी “हम भारत के लोग” या बॅनरखाली आंदोलन केलं. आपला निषेध नोंदवण्यासाठी देशभरातील टीसच्या विद्यार्थ्यांनी मास बंक केला. मुंबईच निषेध करण्यासाठी विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ऑगस्ट क्रांती मैदानात भव्य आंदोलनाचं आवाहन केलं आहे. नागरीकत्व सुधारणा विधेयकाला सामाजिक संघटनांचा जोरदार विरोध कायम आहे. या संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हे कायदे महाराष्ट्रात लागू करु नये म्हणून मागणी देखील केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button