ताज्या घडामोडीराष्ट्रिय

बांधकाम खर्च वाढला!

घरे महागणार

गेल्या अनेक महिन्यांपासून कोळशाच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे लोखंड आणि पोलाद उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. यामुळे त्यांनी लोखंड आणि पोलादाच्या दरात जवळपास २ हजार रुपये टन एवढी वाढ केली आहे. यामुळे इमारत बांधणीचा खर्च वाढल्याने घरांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे त्याच्या दरात वाढ झाली. लोखंड उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर कोळसा लागतो. तो महागल्याने लोखंड आणि पोलादाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली. त्यामुळे कंपन्यांनी पोलाद आणि लोखंडाचे दर २ हजार रुपये टन वाढवले आहेत. जेएसडब्ल्यू स्टीलने २३ मार्चपासून रेबार स्टीलच्या दरात १ हजार २५० रुपये टन वाढ केली आहे. इमारतीच्या बांधकामासाठी याचा वापर केला जातो. सरकारी कंपनी सेलनेही हॉट रोल्ड कॉइल आणि कॉल्ड रोल्ड कॉइलच्या दरात १ हजार ५०० रुपयांची वाढ केली आहे. जिंदाल स्टील अँड पॉवरने पोलादाच्या दरात १ हजार ५०० रुपये टन वाढ केली आहे. व्हॉट रोल्ड कॉईल, सीआरसी व रेबार यांच्या दरातही वाढ केली आहे. यामुळे बांधकाम खर्चात मोठी वाढ झाली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button