पिंपरी / चिंचवड

मोशी येथे भंगारच्या दुकानाला आग

पिंपरी l प्रतिनिधी

मोशी येथे भंगारच्या दुकानाला आग लागल्याची घटना मंगळवारी (दि. 26) मध्यरात्री घडली.

आदर्शनगर, मोशी येथील मोरया कॉलनी येथे असलेल्या एका भंगारच्या दुकानाला मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागली. याबाबत अग्निशमन विभागाला मध्यरात्री दोन वाजता वर्दी मिळाली. त्यानुसार भोसरी उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग इलेक्ट्रिक शोर्टसर्किट झाल्याने लागली होती. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button