breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखानाच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर | महाईन्यूज |

आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखानाच्या अध्यक्षपदी भाजप आमदार आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागली आहे…हा साखर कारखाना म्हणजे प्रवरा सहकारी साखर कारखाना आहे.अहमदनगरमधील प्रवरा येथे असलेला हा आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे. कारखान्याच्या अध्यक्षपदाची माळ विखेंच्या गळ्यात बिनविरोध पडली.

अहमदनगर जिल्ह्यात विखे कुटुंबाचं मोठं प्रस्थ आहे. सहकार आणि संस्थांच्या माध्यमातून विखे कुटुंबाने अहमदनगरच्या राजकारणात पाऊल ठेवलं होतं. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आजोबा म्हणजे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील. विठ्ठलरावांनी 1915 पासून अहमदनगरमधल्या प्रवरा परिसरात सहकार क्षेत्रात काम करण्यासाठी सुरुवात केली होती. त्यांना केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ देऊन गौरवलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button