breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

‘व्हायरल झालेला रॅपचा व्हिडीओ माझ्या मुलाचा नाही’; अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली

पुणे | पुण्यातल्या कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू या धडकेत झाला. या दोन निरपराधांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. त्यानंतर २३ मे रोजी या मुलाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत तो मुलगा एक रॅप साँग म्हणताना आणि शिव्या देताना दिसतो आहे. मात्र या व्हिडीओबाबत आता या मुलाच्या आईने समोर येत स्पष्टीकरण दिलं आहे.

अल्पवयीन मुलाच्या आईने काय म्हटलं?

नमस्कार मी शिवानी अग्रवाल. अल्पवयीन आरोपीची मी आई आहे. मी मीडियाला विनंती करते की व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा माझ्या मुलाचा नाही. तो फेक व्हिडिओ आहे हे कृपा करुन लक्षात घ्या. माझा मुलगा बालसुधारगृहात आहे. मी पोलीस आयुक्तांना विनंती करते की कृपा करुन त्याच्या सुरक्षेची काळजी घ्या. प्लीज, प्लीज, प्लीज, असं त्या म्हणताना दिसत आहेत.

हेही वाचा    –      दोन बळी घेणाऱ्या मुलाला पिझ्झा, बर्गर कुणी दिला? सुप्रिया सुळेंचा सवाल 

https://x.com/TUJunction/status/1793703745223827906

२३ मे रोजी सोशल मीडियावर कथित व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत अल्पवयीन मुलगा अपघात झाल्यानंतर जामिनावर सुटलाय आणि रॅप गाणं म्हणतो आहे. करके बैठा मै नशे इन माय पोर्शे असे त्याचे शब्द आहेत. तसंच तो शिवीगाळही करताना दिसतो आहे. आता या व्हिडीओबाबत मुलाच्या आईने स्पष्टीकरण दिलं आहे आणि व्हिडीओ खोटा आहे असं म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button