breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

“छत्रपतींना इंग्राजांच्या प्रसूतीगृहातून बाहेर काढा”; संभाजी भिंडेचं वादग्रस्त वक्तव्य

अरबी समुद्रातील स्मारक उभारण्याचा बेशरमपणा सरकारने करू नये

पुणे : आपल्या वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत राहणाऱ्या संभाजी भिंडेंचं एक विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे. छत्रपतींना इंग्राजांच्या प्रसूतीगृहातून बाहेर काढा. शिवछत्रपतींचा जन्म हा शिवनेरीवर झाला. त्यांचा जन्म हिंदू पंचांगाच्या तीथीनुसारच झाला पाहिजे, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं आहे.

आमची राज्य सरकारला विनंती आहे. शिवछत्रपतींना इंग्रजांच्या प्रसूतीगृहात बाहेर काढा. शिवछत्रपतींचा जन्म हा शिवनेरीवर झाला. त्याचा जन्म हिंदू पंचांगाच्या तिथीनुसारच झाला पाहिजे. आज त्यांचे नको इतके पुतळे उभारले जात आहेत. अरबी समुद्रात त्यांचे स्मारक होणार आहे. या समुद्रातील स्मारकाचा आणि शिवछत्रपतींच्या आयुष्याचा काहीही संबंध नाही. या स्मारकावर कोट्यावधी रूपये खर्च होणार आहे. सरकारने हे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नये, असं संभाजी भिडे म्हणाले.

शिवरायांच्या राज्यभिषेक झाल्यानंतर हिंदू स्वराज्य स्थापन झालं आणि शिवशक सुरू झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि देशाच्या पंतप्रधानांनी हे लक्षात घ्यावं, ही स्वाभिमान ठासून भरलेला असा हा शिवशक आहे. त्यामुळे अखिल भारतीय स्थरावर तो पोहोचला पाहिजे, असंही संभाजी भिडे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button