breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तळवडे रोड येथील कॅनेरा बॅंकेचे एटीएम चोरट्यांनी स्फोटकाने उडविले

पिंपरी |

त्रिवेणीनगर, तळवडे रोड येथील कॅनेरा बॅंकचे एटीएम स्फोट घडवून आणत उडविले. यात एटीएम सेंटरचे नुकसान झाले असले तरी रोकड सुरक्षित आहे. मात्र पहाटेच्यावेळी झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडली आहे. पिंपरी चिंचवड शहरात नवीन आयुक्‍त येण्यापूर्वीच चोरट्यांनी ही सलामी दिल्याची चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार त्रिवेणीनगर, तळवडे रोड येथे कॅनेरा बॅंकेचे एटीएम आहे. पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी जिलेटीनचा स्फोट घडवून एटीएम उडवून दिले. यामुळे एटीएम सेंटरचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या स्फोटात एटीएमच्या आतील रोकड सुरक्षित राहिली आहे.

पहाटेच्यावेळी झालेल्या स्फोटामुळे नागरिक जागे झाले. दरम्यान स्फोट होताच चोरटे दुचाकीवरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. याबाबत अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button