breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भोसले आहेत म्हणून उदयनराजे माझ्या पेक्षा सरस ठरत नाहीत – खासदार संजय काकडे

उदयनराजे वंशज आहेत तर आम्हीही सुभेदार आहोत

पुणे|महाईन्यूज|

भाजपचे सहयोगी सदस्य असलेले व राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी उदयनराजेंवर तोफ डागली. त्यांनी पुन्हा एकदा उमेदवारीवर दावा सांगून आता मी भाजपकडून इच्छुक असल्याचे सांगितले. दरम्यान, उदयनराजे हे आता भाजपमध्ये आले. त्याचं योगदान मोठं नाही. ते भाजपात आले, निवडणुकीला उभे राहिले अन्ं पडले. तसेच मी उदयनराजे यांच्यापेक्षा सरस आहे. भोसले आहेत म्हणून ते माझ्या पेक्षा सरस ठरत नाहीत असंही त्यांनी म्हटलंय.

राज्यसभेच्या निवडणुका जवळ आल्याने भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार, यावरुन कलगीतुरा रंगला आहे. सर्वच पक्षामध्ये उमेदवारी आपल्याच मिळावी म्हणून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. काकडे म्हणाले की, मी उत्तम काम केलं असून मेरिटच्या आधारे मला तिकीट मिळेल असं मतही त्यांनी व्यक्त केलं. उदयनराजे यांना मंत्रिपद मिळेल असं वाटत नाही असंही ते म्हणाले. मी उदयनराजे यांच्यापेक्षा सरस आहे. भोसले आहेत म्हणून ते माझ्या पेक्षा सरस ठरत नाहीत असंही त्यांनी म्हटलंय. उदयनराजे वंशज आहेत तर आम्हीही सुभेदार आहोत. ते महाराज आहेत. मी देवेंद्र यांचा मोहरा आहे. फडणवीस हेच माझे मोदी शहा आहेत असंही त्यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button