breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सुविधांकडे दुर्लक्ष करणा-या मंगल कार्यालयांना महापालिकेची नोटीस

  • परवाना नुतनीकरणाचे दिले आदेश
  • अन्यथा कारवाई करण्याचा दिला इशारा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शहरातील मंगल कार्यालयांना केंद्रीय हरित प्राधिकरणाच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन, वॉश बेसिन, मुता-या, टॉयलेट्स यांची व्यवस्था करणे अनिवार्य आहे. या नियमांत कसूर केल्याचे आढळल्यास घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 चे तरतुदीनुसार आणि केंद्रीय हरित प्राधिकरणाच्या 2019 मधील नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश आरोग्य विभागाने पारित केले आहेत.

  • पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दित हजारो व्यवसायीक मंगल कार्यालये आहेत. मात्र, याठिकाणी सर्रासपणे नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 च्या तरतुदीनुसार आणि केंद्रीय हरित प्राधिकरणाच्या 2019 मधील नियमांनुसार प्रत्येक मंगल कार्यालयांत घनकचरा व्यवस्थापन, आवश्यक संख्येनुसार वॉश बेसिन, टॉयलेट्स आदींची सुविधा उपलब्ध असने अनिवार्य आहे. परंतु, वॉश बेसिन, टॉयलेट ब्लॉक्स व पुरुष आणि महिलांकरिता मुतारी नसल्याचे आढळले आहे. तर, काही ठिकाणी त्या सुस्थितीत नसल्याचे आढळून आले आहे. बहुतांश कार्यालयांमध्ये वाहनांचे पार्कींगकरिता देखील पुरेशी व्यवस्था नसल्याची बाब देखील समोर आली आहे.

शहरातील मंगल कार्यालयांना महापालिकेमार्फत हेल्थ एनओसी देण्यात येते. त्या एनओसीचे दरवर्षी नुतनीकरण करणे बंधनकारक आहे. परंतु, अनेक आस्थापनांमार्फत हेल्थ एनओसीशिवाय मंगल कार्यालये चालविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. वरील बाबींची पूर्तता करण्याकरिता महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व मंगल कार्यालयांना नोटीस देण्यात आल्या आहेत. परवाना नुतनीकरण करण्याची सूचित आरोग्य विभागाने केली आहे. अन्यथा त्यांचे आस्थापनेविरुध्द घनकचरा व्यवस्थापन अधिनियम, बांधकाम नियंत्रण नियमावली व महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतूदीनुसार नियमाधीन कार्यवाही करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button