breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

मुंबईत घरे स्वस्त होणार, आजपासून नवे दर लागू

घरे, जमीन आणि मालमत्ता खरेदीसाठी मुद्रांक शुल्क आकारणीसाठीचा रेडीरेकनर म्हणजेच वार्षिक मूल्य दरांमध्ये अडीच वर्षांनंतर पेâरबदल करण्यात आले आहेत. मुंबईत या दरात 0.6 टक्क्यांची घट झाल्याने शहर व उपनगरातील घरे स्वस्त होणार आहेत. तर राज्यात सर्वाधिक 3.91 टक्के वाढ पुणे जिल्ह्यामध्ये करण्यात आली आहे, तर मुंबईमध्ये 0.6 टक्के घट झाली आहे. राज्याची सरासरी वाढ 1.74 टक्के असून, फेरबदल करण्यात आलेले नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.

नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक विभागाच्या वतीने घरे, जमिनी या मिळकतींचे बाजारमूल्य निश्चित केले जाते. गेल्या अडीच वर्षांमध्ये यात कोणताही पेâरबदल करण्यात आला नव्हता. कोरोनाच्या पार्श्वमीवर यंदादेखील त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. मंदीचे वातावरण लक्षात घेऊन हे पेâरबदल करण्याचे राज्याचे नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


दरवाढ टक्क्यात)
ठाणे 0.44
नवी मुंबई 0.99
रायगड 3.0
नाशिक 0.74

60 टक्के उत्पन्न घटले
राज्यात कोरोना महामारीनंतरच्या पाच महिन्यांमध्ये मुद्रांक शुल्काचे उत्पन्न 60 टक्क्यांनी घटले आहे. दस्तनोंदणीमध्ये मोठी घट झाली. गेल्या वर्षी या पाच महिन्यांमध्ये पाच लाख 20 हजार दस्तनों95 हजार दस्त असून, उत्पन्न 4675 कोटी रुपये आहे. राज्यात अनलॉक सुरू झाल्यानंतर तसेच राज्य सरकारने घरे खरेदीसाठी स्टॅम्पड्यूटी सवलत दिल्यानंतर दस्त नोंदणीचे प्रमाण वाढले असून, ते सात हजारावरून साडेनऊ हजारापर्यंत गेले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button