breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉक्टर तरुणीचा घरातच आढळला मृतदेह, तपासात असं काही समोर आलं की पोलिसही हादरले

अकोला |

अमरावतीच्या राधानगरात २७ वर्षीय डॉक्टर असलेल्या तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रियंका कातकीडे असं या मृतक तरुणी डॉक्टरचं नाव आहे. तिने सहा महिन्यांपूर्वी प्रकाश दिवान नावाच्या तरुणासोबत मंदिरात लग्न केलं. मात्र, काल बुधवारी पहाटे तिचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आता तिच्या कुटुंबियांनी हा नैसर्गिक मृत्यू नसून तिची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, प्रकाश दिवान हे वैद्यकीय अधिकारी असल्याने अमरावतीत तिच्यावर शवविच्छेदन केल्यास तिच्या वैद्यकीय अहवालात छेडछाड होवू शकते, त्यामुळे अकोल्यात शवविच्छेदन करण्यात यावं, अशी मागणी कुटुंबियांनी धरून ठेवल्याने अकोल्यात तिच्यावर शवविच्छेदन केले गेले.

प्रियंका रमेश कातकीड़े ( वय २७, राहणार यशोदा नगर, जि.अमरावती.) हिने वैद्यकीय परीक्षा दिल्यानंतर निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होती. तर अमरावती येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून पंकज शेषराव दिवान (वय ४१, राहणार राधा नगर, जि. अमरावती.) हे कार्यरत होते. येथून प्रियंका आणि पंकज यांची ओळख झाली, अन् प्रेम सबंध जुळले. त्यानंतर प्रियंकाच्या कुटुंबियांनी पंकज दिवाने यांच्याबरोबर ८ महिन्यापूर्वी म्हणजेच २४ ऑगस्ट २०२१ रोजी मंदिरात लग्न लावून दिले. तेव्हापासून ते दोघेही सोबत राहायचे.

दरम्यान, २० एप्रिल रोजी पहाटे प्रियंकाच्या कुटुंबियांनी तिला कॉल केला असता संपर्क होऊ शकला. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिच्या घराकड़े धाव घेतली. परंतू ती मृत अवस्थेत आढळून आली. लागलीच यासंदर्भात गाडगेनगर पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि घटनेचा पंचनामा सुरू केला. मात्र, तिच्या कुटुंबियांनी हा नैसर्गिक मृत्यू नसून तिची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. त्याआधारे गाडगेनगर पोलिसांनी चौकशीची सूत्रे फिरवली आणि डॉ. दिवाण यांच्यासह घरातील इतर सदस्यांचे बयाणही नोंदवले आहे.

  • पहिली पत्नी असताना केली दुसरी पत्नी…

    प्रकाश याची अगोदर पहिली पत्नी असताना त्याने दुसरी पत्नी केली आहे. अगोदरच्या पत्नीपासून त्याची दोन मुलं असून पहिल्या पत्नीच्या घटस्फोटासाठी कोर्टात खटला सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी अमरावतीचे यशोदा नगरचे शिवसेना नगरसेवक भारत चौधरी यांनी केली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button