Uncategorizedआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपराष्ट्रिय

इंग्लंडमध्ये भारतीय वंशाच्या महिलेचा दोन मुलांसह संशयास्पद मृत्यू, संशयिताला अटक

लंडन : पूर्व इंग्लंडमधील नॉर्थम्प्टन परिसरात भारतीय वंशाची एक महिला तसेच तिच्या दोन मुलांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नॉर्थम्प्टनशायर पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे. सदर महिला आणि दोन मुले त्यांच्या घरात जखमी अवस्थेत आढळले होते, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या स्थानिक पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास सुरू केला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

भारतातील केरळच्या कोट्टायम येथील 40 वर्षीय अंजू अशोक केटरिंग जनरल हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होती. ती तिच्या सहा वर्षांचा मुलगा जीवा आणि चार वर्षांची मुलगी जान्हवी यांच्यासह केटरिंग शहरात राहत होती. गुरुवारी सकाळी पेदरटन कोर्ट परिसरातील घरात हे तिघेही जखमी अवस्थेत पोलिसांना आढळले. या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. तर, दोन मुलांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सध्या अंजू अशोक हिच्या 52 वर्षीय पतीला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. तो तिथल्या एका हॉटेलमध्ये काम करतो. गेल्या एक वर्षापासून ते ब्रिटनमध्ये होते, असे नॉर्थम्प्टनशायरचे पोलीस एरिया कमांडर अधीक्षक स्टीव्ह फ्रीमन यांनी सांगितले.

मृत्यूचे कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक पोस्टमार्टम करण्यात येत आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. महिला आणि दोन मुलांना न्याय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, असेही स्टीव्ह फ्रीमन म्हणाले.

अंजू अशोक ही एक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षित नर्स होती. 2021मध्ये ती आमच्या आमच्या केजीएच कुटुंबात सहभागी झाली. मुख्यतः बर्नवेल बी – आमच्या ऑर्थोपेडिक वॉर्डांपैकी एक असलेल्या वॉर्डात ती कार्यरत होती, असे केटरिंग जनरल हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी डेबोरा नीडहॅम यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button