breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
Casting Couch जे होतं ते दोघांच्या सहमतीनंच होतं – चित्रांगदा सिंग
मुंबई | हिरोइन होण्याचं स्वप्न घेऊन चमचमत्या दुनियेत दाखल होणाऱ्या बहुतेक जणींना कास्टिंग काऊचला सामोरं जावं लागतं असं नेहमी बोललं जातं.कलाकारांची निवड करताना काही निर्मात्यांकडून ‘अपेक्षा’ही वेगळी ठेवली जाते. ‘कॉम्प्रोमाइज’ आणि ‘नो कॉम्प्रोमाइज’ अशी वेगळी यादीच इथं असते.
कॉम्प्रोमाइज करण्याची तयारी असेल, तर पुढच्या गोष्टी होतात.असं असलं तरी बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिनं यावर वेगळं मत व्यक्त केलं आहे. ‘जे होतं ते दोघांच्या सहमतीनंच होतं. तुमच्यासोबत जबरदस्ती करत नाही’,असं तिनं म्हटलं आहे. त्यामुळं बॉलिवूडमधला कास्टिंग काउचचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.