breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंतप्रधान मोदींनी प्रणव मुखर्जींचे घेतले अंत्यदर्शन

नवी दिल्ली – देशाचे माजी राष्ट्रपती, मुरब्बी राजकारणी, काँग्रेसचे संकटमोचक नेते, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी लष्कराच्या रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. आज दिल्लीतील १० राजाजी मार्ग येथील घरी प्रणव मुखर्जींचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याठिकाणी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. दरम्यान, उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांनीदेखील प्रणव मुखर्जी यांचे अंत्यदर्शन घेतले.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर १० ऑगस्ट रोजी मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याचवेळी त्यांना कोरोनाचे निदान झाले होते. मुखर्जी यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवसांच्या दुखवट्याची घोषणा केली आहे.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करून प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे एक युग संपलं आहे’, अशा शब्दांमध्ये त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button