breaking-newsTOP NewsUncategorizedमनोरंजनमुंबई

सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांचा ब्रेकअप, काय आहे नेमके कारण?

मुंबई । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

गेल्या महिन्यात प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन आणि भारतातून पळून गेलेला उद्योजक ललित मोदी यांच्या अफेअर्सची चर्चा रंगली होती. त्यांनी लग्न केल्याची अफवा पसरली होती. मात्र, त्यांनी लग्न केलं नसून त्यांचं फक्त अफेअर असल्याचा खुलासा ललित मोदी याने सोशल मीडियाद्वारे केला होता. मात्र, आता या दोघांचाही ब्रेक अप झाल्याचं म्हटलं जात आहे. महिन्याभरातच या कपलने ब्रेकअप केल्याने नेटीझन्सही आवाक् झाले आहेत.

सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या ब्रेकअपची अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दोघांनीही यावरून कोणतीही पोस्ट केलेली नाही. मात्र, ललित मोदी याने आपल्या सोशल मीडियाच्या प्रोफाईलमध्ये अनेक बदल केले आहेत. ललितने आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरून सुष्मिता सेनचं नाव हटवलं असून फोटोही हटवण्यात आले आहेत. यामुळे हे कपल विभक्त झाले आहेत की काय अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी ललित मोदीने सुष्मिता सेनसोबतचे फोटो पोस्ट केले होते. फोटो पोस्ट करून त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. तसंच, आपल्या बायोमध्येही ललितने सुष्मिताचं नाव लिहिलं होतं. मात्र, ते आता हटवण्यात आल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

काय आहे कारण?
सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल त्याच्या आयुष्यात परत आला असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे एकत्र फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लाल सिंह चढ्ढा चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी हे दोघे एकत्र दिसले होते. तसंच, सुष्मिताच्या मुलीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्येही रोहमन आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button