breaking-newsEnglishTOP NewsUncategorizedआरोग्यमनोरंजनमहाराष्ट्र

इमारतींच्या उद्वाहक (लिफ्ट) बाबत समज गैरसमज… उद्वाहक (लिफ्ट) सेफ्टी ऑफिसर प्रकाश पाटील यांचे एक्झर्बिया अबोडवासियांना अनमोल मार्गदर्शन

  • विद्युत सुरक्षा : लिफ्ट आणि सुरक्षा

वडगाव (मावळ) पुणे । गणेश क्षिरसागर । महान्यूज विशेष प्रतिनिधी ।

सध्या संपूर्ण देशात बांधकाम क्षेत्र कमालीचे विस्तारले आहे, जागेची कमतरता असल्यामुळे उंच टॉवर्स आणि हाय राईज बिल्डिंग्जची संकुले बांधण्याकडे बांधकाम व्यावसायिक जास्त भर देत आहेत. आजच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करणाऱ्या या संकुले व टाऊनशिप्सची निर्मिती हे एक मोठेच आव्हान असतं; त्यासाठी आवश्यक असते दूरदृष्टी, नियोजन, प्रचंड जबाबदारी पेलण्याची तयारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भक्कम आणि भरवशाची साथ! यातच महत्त्वाची बाब म्हणजे विद्युत सुरक्षा आणि ‘लिफ्ट’ अर्थात उद्वाहन. इमारतींच्या उद्वाहक (लिफ्ट) बाबत समज गैरसमज. या विषयावर रविवार दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास तब्बल 22 वर्षे अनुभव असलेले उद्वाहक (लिफ्ट) सेफ्टी ऑफिसर प्रकाश पाटील यांचे एक्झर्बिया अबोडवासियांना अनमोल मार्गदर्शन लाभले. वडगाव (मावळ) येथील जांभुळगाव येथील एक्झर्बिया अबोड सोसायटीमधील गणेशोत्सव मंडळाच्या वतीने उद्वाहक (लिफ्ट) बाबत समज गैरसमज… या विषयावर प्रबोधनात्मक, मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान प्रकाश पाटील बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना पाटील म्हणाले की, लिफ्टमध्ये अडकल्यास घाबरण्याचे काहीही कारण नाही. माणूस गुदमरत नाही. कारण ऑक्सिजन आतमध्ये जायला तशी व्यवस्था लिफ्टमध्ये असते. अशा वेळी अलार्म हे बटन प्रेस करावे. ग्राऊंड फ्लोअरला अलार्म असतो तो लाईट बंद असेल तरीही वाजतो.

लिफ्टमध्ये जो आरसा असतो. तो केवळ लिफ्टद्वारे प्रवास करणारांच्या विरंगुळ्यासाठी असतो. मॅकेन्झी २०१०चा रिपोर्ट असं सांगतो की, भारतामध्ये पुढील २० वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणात शहरीकरण होणार आहे. कामासाठी असलेल्या विविध संधी, शैक्षणिक सुविधा, कला, क्रीडा आणि इतर सांस्कृतिक संधी या सर्वामुळे भारताच्या ग्रामीण भागांतून अधिकाधिक लोकसंख्या शहरांकडे आकर्षित होत आहे. या लोकसंख्येला पुरे पडण्यासाठी शहरी प्रशासनाला प्रचंड प्रमाणात वीज, पाणी, रस्ते, उद्वाहने, मलनि:सारण, कचरा व्यवस्थापन या सर्वासाठी अधिकाधिक यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच त्याला शहरातील उद्योग व्यावसायिकांनी मदतीचा हात दिल्यास ही प्रगती अधिक झपाटय़ाने होईल. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात टॉवर्सची उभारणी झाल्यावर तेथील रहिवाशांना वर-खाली वाहतुकीसाठी जे उपकरण वापरण्यात येते त्यास लिफ्ट अथवा उद्वाहन म्हणतात. आजकाल सर्व हाऊसिंग सोसायटीज, कॉर्पोरेट ऑफिसेस, औद्योगिक क्षेत्र, शॉपिंग मॉल्स इत्यादींमध्ये लिफ्टस्चा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे त्याबाबतचे नियम आणि लिफ्टस्चा सुरक्षितपणे वापर या संदर्भात सर्वसामान्य लोकांना माहिती मिळणे आवश्यक झाले आहे. विद्युत नियमावली ही संपूर्ण हिंदुस्थानात एक आहे. वीज कायदासुद्धा सर्व राज्यांमध्ये एकच आहे, तसे लिफ्टच्या बाबतीत मात्र नाही. लिफ्टचा वेग 1 सेकंद पर मिटर एव्हढा असतो.

लिफ्ट अर्थात उद्वाहनाच्या मेंटेनन्सच्या अभावामुळे रोप तुटून अपघात होऊ शकतात. त्यामुळे लिफ्टचा मेंटेनन्स वेळोवेळी करणे आवश्यक असते, असेही प्रकाश पाटील यांनी यावेळी सांगितले. लिफ्टबाबत असलेल्या शंका, समज, गैरसमज याबाबत एक्झर्बिया अबोड सोसायटी गणेशोत्सवाचे उपाध्यक्ष दीपक पाटील, कार्यवाहक कृष्णा लोखंडे यांनी विचारणा केली.

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आयोजन….

या कार्यक्रमाला यावेळी सोसायटीमधील रहिवाशांसह एक्झर्बिया अबोड गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष धनंजय वाणी, उपाध्यक्ष दीपक पाटील, खजिनदार पंढरीनाथ हिंगे, मार्गदर्शक सतिश कदम, प्रसन्न शिरोडकर, सचिन कासार, प्रकाश कांबळे, कार्यक्रमाचे प्रयोजक विशाल गोडसे, युवराज कदम, सल्लागार सचिन शिंदे, अमोल दिसले, सचिव दिनेश सकट, सहसचिव सत्यवान वाळुंज, कार्यवाहक गणेश क्षिरसागर, सचिन कुंभार, सुनील पवार, कृष्णा लोखंडे, चंद्रशेखर शर्मा, सुमीत पुरी, सागर माळकर, नीलेश परदेशी, बाळासाहेब लभडे, सोहेल शेख, रविंद्र उतेकर, पुंजाजी ससाणे, शरद सातपुते, रविंद्र जाधव, राजेश सोळंकी, पियुष पाटील, अजित गोळराखे, माध्यम प्रतिनिधी सार्थक कुंभार, ओम हिंगे, सुधांशु अनेच्छा, आदित्य कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.

महिन्यातून कमीत कमी एकदा तरी लिफ्टचे सर्व्हिसिंग व्हावी…
महाराष्ट्र उद्वाहन नियम १९५८च्या नियम क्र. ४ प्रमाणे प्रत्येक उद्वाहन ग्राहकाने लिफ्टची उभारणी झाल्यावर महिनाभराच्या आत उद्वाहन निरीक्षकास (Lift Inspector) लायसेन्ससाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यानंतर निरीक्षण होऊन सर्व व्यवस्थित असल्यास सदर लिफ्टला नियम क्र. ४(२) प्रमाणे परवाना दिला जातो, जो प्रत्येक लिफ्टमध्ये लावणे कायद्याने बंधनकारक आहे. जर एखाद्या सोसायटी, कॉर्पोरेटमधील उद्वाहनात हे प्रमाणपत्र लावले नसेल तर त्यास ‘बिगर परवाना’ या अंतर्गत कायदेशीर कारवाई करता येते. कुठल्याही सोसायटी, ऑफिस, हॉस्पिटल, मॉल्स इत्यादी ठिकाणी उभारलेल्या लिफ्टच्या देखभालीसाठी नियम क्र. ६ प्रमाणे शासनप्राप्त उद्वाहन कंत्राटदारास वार्षिक देखभालीचे कंत्राट अर्थात देणे अनिवार्य आहे. सदर कंत्राटदाराने महिन्यातून कमीत कमी एकदा तरी लिफ्टचे सर्व्हिसिंग करून निर्माण झालेल्या त्रुटींची संबंधितांशी चर्चा करून दूर कराव्यात असे निर्देश आहेत.

लिफ्ट ऑपरेटर हा कमीत कमी अठरा वर्षे पूर्ण केलेला असणे बंधनकारक आहे. तसेच लिफ्ट व्यवस्थितपणे कार्यरत ठेवण्यामध्ये तो प्रशिक्षित असावा.
कुठल्याही लिफ्टमध्ये अपघात घडल्यास नियम क्र. ८ प्रमाणे फॉर्म ‘एफ’मध्ये निरीक्षक कार्यालयात २४ तासांच्या आत माहिती देणे आवश्यक आहे.
लिफ्ट कार जी लिफ्टच्या पिटमध्ये वर-खाली प्रवास करीत असते. तिच्या ट्रॅव्हेलिंग केबल्स या फ्लेक्झिबल (लवचीक) आणि अग्निरोधक (Fire proof) असणे आवश्यक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button