breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची दुरवस्था : १६ कोटींचा भ्रष्टाचार?; नाट्यधर्मी निर्माता संघाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांचा आरोप

मुंबई | प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिकेने पाच वर्षांपूर्वी तब्बल सोळा कोटी रुपये खर्च करुन डागडुजी केलेल्या दीनानाथ नाट्यगृहाची अवस्था दयनीय झाली आहे.
नाट्यधर्मी निर्माता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष नाट्यगृहात जाऊन घेतलेला आढावा घेतला आहे.

‘पुन:श्च हरीओम’ म्हणून नाट्यप्रयोगांना परवानगी दिल्याबद्दल राज्य सरकारचं अभिनंदन करायचं की नाट्यगृहांची दूरवस्था बघून दूषणं द्यायची? जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने जेव्हा नाट्यगृहांची पाहणी सुरु केली तेव्हा त्यांना धक्काच बसला.
विलेपार्ल्यातील दीनानाथ नाट्यगृहात प्रसाधनगृहांची अवस्था इतकी वाईट असेल तर तिथे प्रेक्षकांनी का यावं? कोरोनाकाळात स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व द्यायला हवं, पण इथे तर सगळा उफराटा कारभार आहे. केवळ पाचच वर्षांपूर्वी सोळा कोटी रुपये खर्च करुन डागडुजीच्या नावाखाली महापालिकेने नेमके कुणाचे खिसे गरम केले होते?
सोळा कोटी रुपयात खरंतर अद्ययावत नवीन नाट्यगृह बांधून झालं असतं, आणि इथे डागडुजीसाठी सोळा कोटी रुपये खर्च करुनही तकलादू काम करुन ठेवलेलं आहे.
सध्या सुरु असलेल्या या कामासाठी शहा नावाचा सुपरवायझर बसवलाय. सध्याचं काम कधी सुरु होणार आणि कधी संपणार हेसुद्धा त्याला माहिती नाही. असं असेल तर मग कलाकारांच्या पाठीशी उभं राहण्याचं ‘नाटक’ सरकार कशाला करतंय?
अशा वास्तूत नाट्यप्रयोगांना परवानगी देऊन सरकार काय साध्य करु पाहतंय? नाट्यव्यवसायाला पुन्हा एकदा लवकरात लवकर उभारी मिळावी, हाच आमचा उद्देश आहे, अशी प्रतिक्रिया अमेय खोपकर यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button