breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त

मुंबई – ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. दीवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवान यांच्याशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात शिंदे यांची मुलगी प्रीती राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेली मालमत्ता ही अंधेरीतल्या कालेडोनिया इमारतीमधील आहे.

ईडीने म्हटलं की, मनी लॉन्ड्रिंग कायद्यांर्तग (पीएमएलए) कारवाई केलेल्या मालमत्तांमध्ये अंधेरी (पूर्व), मुंबई येथील कॅलेडोनिया बिल्डिंगमधील 10,550 चौरस फूट दोन व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. 35..48 कोटींची मालमत्ता राज श्रॉफ आणि त्यांची पत्नी प्रीती श्रॉफ यांच्या मालकीची आहे. प्रीती श्रॉफ कॉंग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आहे.

डीएचएफएल (DHFL) अनेक घोटाळ्यांमध्ये सामील

पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) दीवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडला दिलेलं 3,688.58 कोटी कर्जाला घोटाळा घोषित केलं आहे. येस बँकेतील घोटाळ्याबाबतही या कंपनीची चौकशी सुरु आहे. कंपनीचे प्रमोटर वाधवान बंधू अटकेत आहेत आणि त्यांची मालमत्ता देखील ईडीने जप्त केली आहे. येस बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने माजी बँक प्रमुख राणा कपूर आणि डीएचएफएलचे प्रमोटर कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्याकडे 2400 कोटी रुपयांची संपत्ती अटॅच केली आहे. यात राणा कपूरचे 1000 कोटी आणि वाधवान बंधूंच्या 1400 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबरमध्ये दिवाळखोरी प्रक्रियेसाठी डीएचएफएलला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी) सोपवले आहे. डीएचएफएल ही पहिली वित्तीय कंपनी आहे, ज्या कंपनीला आरबीआयने एनसीएलटीला कलम 227 अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करून पाठवले. तत्पूर्वी कंपनीचे बोर्ड बरखास्त करण्यात आले आहे आणि प्रशासक म्हणून आर सुब्रमण्यम कुमार यांची नियुक्ती केली गेली. आयबीसी अंतर्गत ते रिझोल्यूशन प्रोफेशनल देखील आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button