breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

ऊशिरा झोपून ऊशिरा ऊठलंं तर नाही चालणार का ? पाहुयात काय आहे उत्तर…

झोप हा शब्द उच्चारला तरी सर्वांच्या चेह-यावर एक आरामची झलक पहायला मिळते…कारण झोप ही सर्वांच्याच आवडीची…झोपेसाठी कोणीही कधीही तयार असतो त्यासाठी वेळ आपल्यासाठी अजिबातच महत्वाची ठरत नसते….पण आपल्या घरातले मोठ्यांची हीच शिकवण असते की ” लवकर नीजे लवकर ऊठे तया आरोग्यसंपदा लाभे “…यावरून एकच प्रश्न डोक्यात येतो की, खरचं विश्रांती घेण्यासाठीच्या पण योग्य वेळ असू शकते.आणि त्याचे चांगले -वाीट परिणाम आपल्या आरोग्यावर आणि जीवनावर होतात का ? चागलं आरोग्य लाभण्यासाठी लवकरच झोपून लवकर उठणेच गरजेच असत का ऊशिरा झोपून ऊशिरा ऊठले तर नाही चालणार का? तुम्हाला काय वाटतं ? पाहुयात मग काय आहे याच उत्तर…


खरं तर आपल्या शरीरात एक जैवीक नावाचं घड्याळ सातत टीकटीक करत असतं. आणि ते अतिशय कायम कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते.रात्री 11 ते पहाटे 3 या कालावधीत आपल्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मुख्यत्वे तुमच्या यकृतात रोखलेली असते. यकृत अधिकचे रक्त साठल्यामुळे मोठे होते. ह्या वेळेस खरंतर शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची महत्वाची प्रक्रिया होत असते. यकृत तुमच्या शरीरातील दिवसभरात साठलेल्या विषद्रव्यांचे निष्क्रियीकरण करुन त्यांना बाहेर काढण्याचे अतिमहत्वाचे कार्य ह्या रात्री 11 ते पहाटे 3 च्या वेळेत होत असते. आणि जर आपण या वेळेत झोप घेऊ शकलो नाही तर आपले यकृत ही विषद्रव्ये बाहेर फेकण्याचे काम व्यवस्थित करू शकणार नाही…त्यामुळे जर रात्री 11 वाजता आपण झोपी गेलो यकृताला शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी पुर्ण 4 तासांचा निवांत वेळ मिळतो.जर आपण 12 वाजता झोपलो तर 3तासाचा वेळ मिळेलं..1 वाजता झोपलो तर 2 तास आणि फारच उशिरा म्हणजे 2 वाजता झोपलो तर फक्त 1 तासच शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी यकृताला वेळ मिळेलं…कधी याहीपेक्षा उशिरा झोपलो म्हणजे पहाटे 3 नंतर तर मात्र दुर्दैवाने शरीराकडे विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी वेळच उरणार नाही आणि नक्कीच ते आपल्या शरिरासाठी हानिकारक ठरणारं आहे. विषारी द्रव्ये आपल्या शरीरातून बाहेर नाही पडले तर कालानुक्रमे वाढतच जातील. त्याचे वाईट परिणाम आपल्या शरिरावर होतो.


ऊशिरा झोपुन ऊशिरा उठणं आपल्या आरोग्यासाठी खुप धोकादायक आहे. आपण आपल्या शरिराला विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी वेळच दिला नाही तर, शरिराच्या इतर क्रियांचे वेळापत्रक सुद्धा बिघडलं जातं…

1…पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या वेळेत शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया ही फुफ्फुसांच्या मधे केंद्रीत होते. ह्या वेळेस शारिरीक हलचाली आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊन शरीरात ऊर्जा साठवण्यासाठी बागेत फिरायला जायला हवं. ह्या सकाळच्या वेळेस हवा ही खुप शुद्ध असते आणि शरीरास आवश्यक असते…



2…त्यानंतर सकाळच्या 5 ते 7 ह्या वेळेस रक्ताभिसरणाची क्रिया मोठ्या आतड्यात केंद्रित होते. यावेळेत शौचकर्म ऊरकून घ्यायला हवे. मोठ्या आतड्यातून सर्व मैला बाहेर जाऊ दिलं पाहिजे त्यामुळे दिवसभरात आवश्यक असणारी पोषणद्रव्ये आत्मसात करण्यासाठी शरिरही तयार होतं…

3…सकाळी 7 ते 9 च्या वेळेत रक्ताभिसरण आपल्या पोटाच्या ठिकाणी केंद्रीत होते.यावेळेस आपण नाश्ता करायला हवा… नाश्ता हा संपुर्ण दिवसभरातील सर्वात महत्वाचा आहार आहे. पण नाश्ताही पौष्टीक असणंही महत्वाचं आहे…

या वेळापत्रकात बाजी मारतात ती ग्रामिण भागातील लोक किंवा शेतावर राहणारे शेतकरी… ते कायम लवकर झोपून लवकर ऊठतात. ते त्यांचे शरीरीचे नैसर्गिक जैविक घड्याळ पाळतात.त्यामुळे शारिरिक दृष्ट्या नेहमीच सुदृढ असतात…

त्याच्या तुलनेत शहरातल्या लोकांंच हे वेळापत्रक कायमचं कोलमडलेलं असतं…कारण शहरातील लोकांची लाईफस्टाईलं पाहता ,किंवा त्यांच्या कामाच्या वेळा पाहता घडाळ्याच्या काट्यावर धावणा-या या शहरी लोकांना त्यांच्या शरिराचं जैविक घड्याऴ पाळणं मात्र जमत नाही…त्यामुळे त्यांच्याबाबतीत शरिराच्या अनेक तक्रारी पहायला मिळतात…

त्यामुळे सहज शक्य नसलं करी प्रयत्न केला तर नक्कीच आपण सर्वचजण हे वेळापत्रक पाळू शकलो तर, आपण आपल्या शरिराला निरोगी ठेवू शकतो आणि दिवसभर आपला मुडही ताजातवाना राहण्यास मदत होते… प्रयत्न केला तर काही अशक्य नाही ….आणि आपल्या शरिरापेक्षा दुसरे काहीच महत्वाचं नाही हे जरी लक्षात ठेवलं तरी खूप झालं ….


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button