breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

अखेर मुंबईत अर्धवातानुकूलित लोकल धावणार

बम्बार्डियर, मेधाला तांत्रिक साहित्य पुरवण्याचे कंत्राट

मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर १२ डब्यांची अर्धवातानुकूलित लोकल चालविणे शक्य होणार आहे. या लोकलचे सहा डबे वातानुकूलित आणि सहा डबे बिगर वातानुकूलित असतील, अशी माहिती एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिली.

चेन्नईतील रेल्वे कारखान्यातून मुंबईत बारा डब्यांच्या ३९ वातानुकूलित लोकल गाडय़ा टप्प्याटप्याने आणून त्यांचे रूपांतर अर्धवातानुकूलित लोकलमध्ये करण्यात येणार आहे. या गाडय़ांसाठी लागणाऱ्या तांत्रिक साहित्याचा पुरवठा करण्याचे काम मेधा आणि बम्बार्डियर कंपनीला देण्यात येत असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. बांधणीसाठी एक वातानुकूलित लोकल मार्च २०१९ नंतर मुंबईत येणार आहे. या लोकलपासून दोन अर्धवातानुकूलित लोकल बांधण्यात येतील.

पश्चिम रेल्वेमार्गावर सध्या एक वातानुकूलित लोकल चालविण्यात येत आहे. या लोकलचे भाडे परवडणारे नसल्याने अर्धवातानुकूलित लोकल चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा ७८ अर्धवातानुकूलित लोकल गाडय़ा पश्चिम आणि मध्य रेल्वेवर चालविण्यात येणार आहेत. अर्धवातानुकूलित लोकल गाडय़ांची बांधणी मुंबईतील कारशेडमध्ये करण्यात येणार आहे. रेल्वेच्या चेन्नईतील कारखान्यातून ३९ वातानुकूलित लोकल मुंबईत आणण्यात येतील.  बम्बार्डियर आणि स्वदेशी मेधा कंपनीचे तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या बिगर वातानुकूलित लोकल  मुंबईत धावत आहेत. तेच तंत्रज्ञान असलेल्या ३९ बिगर वातानुकूलित लोकल गाडय़ांना वातानुकूलित डबे जोडण्यात येतील. त्यासाठी तांत्रिक साहित्याचा पुरवठा करण्याचे काम याच कंपन्यांना देण्यात येत असल्याचे  रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

एका लोकलसाठी  ६० कोटी

३९ वातानुकूलित लोकल गाडीची बांधणी चेन्नईतील रेल्वेच्या कारखान्यात केली जाईल. त्यापैकी प्रत्येक लोकलच्या बांधणीसाठी ५५ ते ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मार्च २०१९ नंतर प्रत्येक महिन्याला एक लोकल चेन्नईहून मुंबईत दाखल होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button