breaking-newsराष्ट्रिय

मातीचा ढिगारा कोसळून उत्तरप्रदेशात सहा मजूर ठार

बरेली – उत्तरप्रदेशात बरेली येथे पिलभीत बायपास रोडवर 4 जी केबल साठी खणलेल्या खड्ड्याचा मातीचा ढिगारा कोसळून त्याखाली सहा मजुर ठार झाले. ही केबल टाकण्यासाठी पंधरा फूट खोलीचा खड्डा खणण्यात आला होता. त्यातील माती त्यांनी या खड्ड्याच्या कडेलाच टाकली होती त्या मातीचा डोंगर झाला होता. तीच माती या खड्ड्यात कोसळून या मजुरांचा बळी गेला. या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश देण्यात आला असून पोलिसांनी ड्रिल मशिनचा ऑपरेटर अन्शुल याला अटक केली आहे.

या माती खाली मजूर गाडले गेल्याची माहिती समजताच सिव्हील डिफेन्सच्या पथकाने तातडीने प्रयत्नांची शिकस्त करून या सर्वांना बाहेर काढले पण त्यातील पाच जण जागीच मरण पावल्याचे लक्षात आले सहाव्या मजुराचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणातील अन्य दोन जखमींवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button