breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

#SushantSinghSuicide Case: पाटण्याचे एसपी बळजबरीने क्वारंटाईन, बिहारच्या पोलिस महासंचालकांचा आरोप

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईला आलेल्या बिहारच्या एसपींना बळजबरीने क्वारंटाईन केल्याचा आरोप होत आहे. पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांनी बीएमसीने जाणूनबुजून क्वारंटाईन केल्याचा आरोप आहे. बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्हिडीओ ट्वीट करत आरोप केला आहे. “सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाचे नेतृत्व करणारे विनय तिवारी. ते बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.

मुंबईत (काल) रात्री 11 वाजता त्यांना बळजबरीने क्वारंटाईन करण्यात आले आहे. आता ते कुठेच निघू शकत नाहीत” असा दावा पांडे यांनी ट्विटरवर केला आहे. “विनय तिवारी यांनी विनंती करुनही त्यांची आयपीएस मेसमध्ये व्यवस्था करण्यात आलेली नाही. ते गोरेगावच्या गेस्ट हाऊसमध्ये राहत आहेत” असेही पांडे यांनी फेसबुकवर सांगितलेले आहे. विनय तिवारी यांच्या हातावर मुंबई महापालिकेने मारलेल्या होम क्वारंटाईनच्या शिक्क्यात 15 ऑगस्ट ही तारीख दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button