breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

गुजराती समाजाने राष्ट्रीय एकात्त्मता निर्माण केली : आमदार उमा खापरे

पिंपरी । महाईन्यूज। विशेष प्रतिनिधी ।

प्राधिकरण येथील श्री द्वारकाधिश सेवा मंडळ व गरवी गुजराती समाजाच्या वतीने रावेत येथे नऊ दिवसाचा नवरात्र महोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा झाला. पिंपरी चिंचवड शहरातील गुजराती बांधव गेली अनेकवर्षे या शहरात नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झाले असून नवरात्र निमित्त समाज बांधव एकत्र येवून रासगरबा दांडीयाचा खेळ खेळून आनंद लुटतात. यंदाच्या वर्षी नवरात्रौ उत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या सेवाभावी संस्था, व्यक्ती आदींचा सत्कार आमदार उमा खापरे, श्री द्वारकाधिश सेवा मंडळाच्या अध्यक्षा किरण पटेल, गरवी गुजराती समाजाचे अध्यक्ष मुकेश चुडासमा, धनश्याम गजेरा, भरत दवे, ऋतिक पटेल, हार्दिक जानी, राम राज्यगुरु, जेन्ती राठोड, जिग्नेश पटेल, गीरधर विराणी यांच्या हस्ते अमित गोरखे (शैक्षणिक), सुर्यकांत मुथीयान (पर्यावरण) अशोक तनपुरे (पोलिस मित्र संघटना) जतीन परमार (मानवी हक्क सेवा) डॉ. गणेश अंबिके (आरोेग्य व आपत्ती व्यवस्थापन) गुलामअली भालदार (चिंचवड प्रवासी संघ) सुरज आसदकर (वृत्तपत्रातील डिझाईनर) सुहास जोशी (अन्नदान आरोग्य) विल्यम साळवी (व्यसनमुक्ती) यांना स्मृतीचिन्ह व शाल देवून गौरविण्यात आले.
आमदार उमा खापरे याप्रसंगी पुढे म्हणाल्या, माझे बालपण मुंबईत गेले आज येथे पारंपारिक गुजराती गायक, वादकांच्या सुर-तालाने मी मंत्रमुग्ध झाली असून येथे अनेक वर्षांनी गरबा खेळ खेळून माझ्या बालपणाची आठवणी ताज्या झाल्या. देशभरात गुजराती समाज हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतो. नवरात्रौ महोत्सवात येथील संस्थांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करून खर्‍याअर्थाने नवरात्रौ सणानिमित्त जणू राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली. सत्कारमुर्ती सर्व मान्यवरांनी शहराच्या विकासात आपापल्या क्षमतेनुसार कार्यरत आहे. अशांना एकत्रित करून त्यांना गौरविण्यात आले. ही देखील कौतुकास्पद बाब आहे.
यावेळी श्री द्वारकाधिश सेवा मंडळाच्या अध्यक्षा किरण पटेल यांच्याहस्ते आमदार उमा खापरे यांचा खास स्मृतिचिन्ह गौरव व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना गरवी गुजराती समाजाचे अध्यक्ष मुकेश चुडासमा यांनी केले., आभार भरत दवे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button