breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा सल्ला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जितेंद्रानंदांची जहरी टीका

नवी दिल्ली : हिंदू साधू आणि संतांच्या सर्वोच्च संस्थांपैकी एक अखिल भारतीय संत समितीने राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता राम मंदिर भूमिपूजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्याची सूचना केलेली होती. यावर अखिल भारतीय संत समितीचे महासचिव जितेंद्रानंद सरस्वती यांनी जहरी टीका केलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठ्या नेत्याचा नालायक मुलगा असल्याची जहरी टीका त्यांनी केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता आहे.

जितेंद्रानंद म्हणाले, “उद्धव ठाकरे एका मोठ्या नेत्याचा नालायक मुलगा आहे. ते त्या मोठ्या नेत्याच्या वारशावर ताबा मिळवत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कॉनव्हेंट शाळेत शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांना वास्तवात आणि व्हर्च्युअल यातला फरक कळत नाहीये.

“इटालियन बटालियनच्या कुशीत बसल्याने असंच होणार”

जितेंद्रानंद सरस्वती म्हणाले, “बापाच्या वारशांवर नालायक मुलगा बसलेला आहे. त्याला धर्म, अध्यात्माची भाषा राजकारणाची भाषा वाटते आहे हे दुखद आहे. इटालियन बटालियनच्या कुशीत बसल्यावर हेच होणार आहे. तुम्ही यापेक्षा अधिक काही अपेक्षितही करु शकता?”

सरस्वती यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राम मंदिराला पाठिंबा देण्याच्या भूमिकेचं कौतुक केलेलं आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचे वडील एक मोठी व्यक्ती होते. मात्र, उद्धव ठाकरे एका मिशनरी शाळेत शिकत होते आणि आता त्यांना आभासी आणि वास्तवामधील फरक लक्षात येत नाही. पृथ्वीला स्पर्श केल्याशिवाय भूमिपूजन कसं करु शकतो?” भूमिपूजनासाठी आमंत्रित धर्मगुरुंनी सांगितलं, की या कार्यक्रमात सहभागी होणारे उद्योगपती अयोध्याचं पुनर्निमाण करण्यासाठी मदत करणार आहेत. आजची अयोध्या भविष्यात भारताची अध्यात्मिक राजधानी असणार आहे. अनेक उद्योगपती येथे येणार आहेत. ते अयोध्येची पुनर्निमिती करण्यात मदत करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

“आता काशी आणि मथुरेतील मंदिरांची प्रतिक्षा”

जितेंद्रानंद सरस्वती आता काशी आणि मथुरामध्ये देखील भविष्यात मंदिरं निर्माण करण्यासाठी उत्सुक आहेत. ते म्हणाले, “आपण राम जन्मभूमीनंतर कृष्ण जन्मभूमीचे देखील साक्षीदार असू अशी अपेक्षा आहे. काशी आणि मथुरा आमच्यासाठी वेगळे नाहीयेत. आम्हाला केवळ आमची 3 मंदिरं परत हवी आहेत. ”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button