क्रिडाताज्या घडामोडी

टीममध्ये एकोपा वाढवणं आणि प्रदर्शन सुधारण्यासाठी बीसीसीआयचे 10 कठोर नियम

बीसीसीआयने सर्वच क्रिकेटपटूंसाठी देशांतर्गत क्रिकेट सामने खेळणं बंधनकारक

दिल्ली : मागच्या काही महिन्यापासून टीम इंडिया सातत्याने खराब प्रदर्शन करतेय. आधी श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीज, त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरीज आणि अलीकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वीकारावा लागलेला दारुण पराभव. इतकच नाही, ऑस्ट्रेलियात दौऱ्यात टीममध्ये अंतर्गत मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्या. टीमची खालावलेली कामगिरी आणि ड्रेसिंग रुममधील वादाच्या बातम्या समोर आल्यानंतर BCCI काही कठोर पावल उचलेल अशी अपेक्षा होती. बीसीसीआयने रिव्यू मीटिंगनंतर काही निर्णय घेतले आहेत. टीममध्ये एकोपा वाढवणं आणि प्रदर्शन सुधारण्यासाठी बीसीसीआयने 10 कठोर नियम बनवले आहेत. जाणून घेऊया हे नियम.

बीसीसीआयने सर्वच क्रिकेटपटूंसाठी देशांतर्गत क्रिकेट सामने खेळणं बंधनकारक केलं आहे. सर्व क्रिकेटपटूंना देशांतर्गत इकोसिस्टमशी जोडून ठेवणं हा या गाइडलाइनमागे मुख्य उद्देश आहे. यामुळे उदयोन्मुख क्रिकेटर्सना देशातील टॉप क्रिकेटर्ससोबत खेळण्याची संधी मिळेल. नॅशनल टीमच्या खेळाडूंना यातून सवलत हवी असेल, तर आधीच सिलेक्शन कमिटीला तसं सांगाव लागले.

बीसीसीआयने सर्वच खेळाडूंना मॅचपासून ते प्रॅक्टिस सेशन पर्यंत एकत्र प्रवास करणं अनिवार्य केलं आहे. काही खास कारण असल्यास स्वतंत्र प्रवास करण्यासाठी हेड कोच, सिलेक्शन कमिटीचे चेअरमनची परवानगी घ्यावी लागेल.

यापुढे दौऱ्यावर जाताना लिमिट बाहेर सामान असल्याने खेळाडूंना स्वत:ला त्याचा खर्च करावा लागेल. बोर्डाच्या गाइडलाइननुसार 30 दिवसापेक्षा जास्तच्या परदेश दौऱ्यासाठी खेळाडू 150 किलो वजन घेऊन जाऊ शकतात. तेच सपोर्ट स्टाफला 80 किलो वजन नेता येईल. 30 दिवसापेक्षा कमी कालावधीच्या दौऱ्यासाठी 120 किलो वजनी सामान नेण्याची परवानगी असेल. सपोर्ट स्टाफला 60 किलो वजन नेण्याची परवानगी असेल. दुसरा नियम देशांतर्गत मालिकांसाठीही असेल.

आता कुठलाही प्लेयर सीरीज दरम्यान सोबत पर्सनल स्टाफ उदहारणार्थ शेफ, पर्सनल मॅनेजर, ट्रेनर, सेक्रेटरी किंवा असिस्टेंट घेऊन जाऊ शकत नाही. त्यासाठी बोर्डाची परवानगी लागेल.

बंगळुरुमध्ये असलेल्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये खेळाडूंना व्यक्तीगत सामान, उपकरण पाठवण्यासाठी टीम मॅनेजमेंटशी चर्चा करावी लागेल. एक्स्ट्रा खर्च असल्यास स्वत:ला पेमेंट करावं लागेल.

सर्व खेळाडूंना प्रॅक्टिस सेशन दरम्यान एकत्र रहावं लागेल. वेळेआधी ते ट्रेनिंग सेशनमधून बाहेर निघू शकत नाही.

वेन्यूच्या ठिकाणी एकत्र ट्रॅव्हल करावा लागेल.

बीसीसीआयच्या नवीन नियमानुसार खेळाडू आता कुठल्याही दौऱ्यावर किंवा सीरीज दरम्यान पर्सनल एड शूट करु शकत नाहीत.

टीम परदेश दौऱ्यावर 45 किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांसाठी जात असेल, तर खेळाडूची पत्नी, पार्टनर किंवा कुटुंब त्या दौऱ्यावर फक्त 14 दिवस सोबत राहू शकतात. बीसीसीआय रहाण्याशिवाय त्यांचा दुसरा कुठलाही खर्च करणार नाही.

सीरीज किंवा मॅच लवकर संपली, तर प्लानिंगनुसारच ट्रॅव्हल करावं लागेल. वेळेआधी टीमला सोडून जाता येणार नाही. त्यांना टीमसोबतच रहावं लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button