Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘इमर्जन्सी’ चित्रपटातून ऐतिहासिक मागोवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून आणिबाणीच्या काळाचा ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला असून या कालावधीतील घटनाक्रम अचूकपणे टिपण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन ‘बीकेसी’तील पीव्हीआर येथे करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या नायिका कंगना राणावत, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, चित्रपटाची संपूर्ण टीम आणि प्रेक्षक उपस्थित होते.

हेही वाचा     –      ‘स्टार्टअप्स’साठीचे नवीन धोरण देशातील सर्वाधिक आधुनिक ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आणिबाणीच्या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बाजूला ठेवण्यात आले. मात्र ही घटना देशाच्या प्रत्येक नागरिकांस माहिती होणे आवश्यक आहे. आणिबाणीच्या कालखंडात नागरिकांचे अधिकार काढून घेण्यात आले होते. लोकशाहीवरील या संकटाची माहिती देशातील नागरिकांना कळणे गरजेचे आहे, असेही प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यावेळी केले.

अभिनेत्री कंगना राणावत यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांची भूमिका अतिशय उत्तम रंगवली असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button