हैदराबाद-राजस्थान एलिमिनेटरसाठी सज्ज, कोण पोहचणार क्वालिफायर 2 मध्ये?

SRH vs RR : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मंगळवारी 26 मे रोजी क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायन्सवर मात करत आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील फायनलमध्ये धडक दिली. तर गुजरात टायटन्सला पॉइटंस टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी राहिल्याने पराभवानंतरही अंतिम फेरीत पोहचण्याची अतिरिक्त संधी मिळणार आहे. मात्र गुजरातला त्यासाठी क्वालिफायर 2 सामना खेळावा लागणार आहे. गुजरातसमोर क्वालिफायर 2 सामन्यात कुणाचं आव्हान असणार? हे 27 मे रोजी निश्चित होणार आहे. बुधवारी एलिमिनेटर सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध भिडणार आहे. मात्र त्याआधी चाहत्यांचं एलिमिनेटर सामन्याकडे लक्ष असणार आहे. या एलिमिनेटर सामन्यात रियान पराग राजस्थानचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे सनरायझर्स हैदराबादच्या नेतृत्वाची धुरा असणार आहे. या निमित्ताने एलिमिनेटर सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामना कधी?
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामना बुधवारी 27 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा – सायकलिंग म्हणजे मेंदूचे ‘रिचार्जिंग’… फक्त फिटनेस नाही तर बैद्धिक क्षमताही वाढवते
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामना कुठे?
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामना महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, न्यू चंडीगड इथे होणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामना कुठे?
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामना महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, न्यू चंडीगड इथे होणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच जिओ हॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
दरम्यान हैदराबाद विरुद्ध राजस्थान यांच्यात आतापर्यंत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 3 सामने खेळवण्यात आले आहेत. हैदराबादचा या 23 पैकी सर्वाधिक सामन्यात दबदबा राहिला आहे. हैदराबादने राजस्थानला 14 सामन्यांत पराभूत केलंय. तर राजस्थानने हैदराबाद विरुद्ध 9 सामने जिंकले आहेत.





