Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी

Loan, ATM, UPI वापरताय? RBI चे नवे नियम माहित नसतील तर होऊ शकतं नुकसान

RBI New Rules 2026: RBI New Rules 2026 नावाने अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र त्यातील प्रत्येक माहिती अधिकृत असेलच असं नाही. काही नियम RBI च्या मार्गदर्शक सूचनांवर आधारित असतात, तर काही दावे अतिशयोक्तीपूर्णही असू शकतात. त्यामुळे कोणताही नियम अंतिम मानण्यापूर्वी RBI ची अधिकृत वेबसाइट किंवा बँकेची सूचना तपासणं महत्त्वाचं आहे.

तरीही एक गोष्ट स्पष्ट आहे, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) डिजिटल फसवणूक रोखणे, ग्राहकांची गोपनीयता जपणे आणि बँकिंग प्रणाली अधिक पारदर्शक व जबाबदार करण्यासाठी सातत्याने कडक नियम करत आहे.

जर तुम्ही होम लोन, कार लोन, पर्सनल लोन, एज्युकेशन लोन घेतलं असेल, ATM वापरत असाल, ऑनलाइन व्यवहार करत असाल किंवा Loan Apps वापरत असाल, तर 2026 मधील काही महत्त्वाचे बदल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.

  1. फ्लोटिंग रेट लोन लवकर फेडल्यास अतिरिक्त चार्ज नाही

RBI ने बँका आणि NBFC कंपन्यांना फ्लोटिंग व्याजदर असलेल्या पर्सनल लोनवर foreclosure किंवा prepayment charge न आकारण्याचे निर्देश दिले आहेत. याचा अर्थ, तुम्ही जर होम लोन, कार लोन, पर्सनल लोन किंवा एज्युकेशन लोन फ्लोटिंग इंटरेस्ट रेटवर घेतलं असेल आणि ते मुदतीआधी बंद करायचं असेल, तर अतिरिक्त दंड आकारला जाणार नाही.

पूर्वी अनेक बँका 2 ते 4 टक्क्यांपर्यंत foreclosure charge आकारत असत. म्हणजे स्वतःचं कर्ज लवकर फेडलं तरी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत होते.

यामुळे आता:

-कर्ज लवकर बंद करणं सोपं होईल

-व्याजाचा भार कमी होईल

–Balance Transfer करणे सोपे होईल

-EMI Planning करणं सोप होईल

हेही वाचा –  हैदराबाद-राजस्थान एलिमिनेटरसाठी सज्ज, कोण पोहचणार क्वालिफायर 2 मध्ये?

  1. ATM मधून पैसे आले नाहीत पण खात्यातून कट झाले? बँक देईल नुकसानभरपाई

ATM वापरणाऱ्यांसाठी हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. जर ATM मधून पैसे बाहेर आले नाहीत, पण तुमच्या खात्यातून रक्कम वजा झाली, तर बँकेला ठराविक वेळेत पैसे परत करावे लागतील.

RBI च्या नियमानुसार:

5 कामकाजाच्या दिवसांत पैसे परत करणं बंधनकारक आहे

उशीर झाल्यास दररोज ₹100 नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे

भारतामध्ये ATM फेल होणे, ट्रान्झॅक्शन एरर किंवा रिव्हर्सलमध्ये उशीर या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे RBI ग्राहक संरक्षणावर अधिक भर देत आहे.

  1. SMS OTP ची जागा घेणार अधिक सुरक्षित तंत्रज्ञान

डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बँकिंग क्षेत्र आता SMS OTP पलीकडील सुरक्षा प्रणालींवर भर देत आहेा. हाय-वॅल्यू व्यवहारांसाठी पुढील पर्याय असू शकतात:

Biometric Authentication

Face ID Verification

App-Based Approval Token

कारण सायबर गुन्हेगार:

SIM Swap

OTP चोरी

Phishing Attack

यांच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करतात.

मात्र, SMS OTP पूर्णपणे बंद होणार असल्याची अधिकृत घोषणा RBI कडून झालेली नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

  1. Minimum Balance वर बँकांची मनमानी कमी होणार?

Minimum Balance न ठेवल्यामुळे ग्राहकांना लागणाऱ्या दंडावरही RBI अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करत आहे.

RBI चं म्हणणं आहे की:

Hidden Charges टाळले जावेत

ग्राहकांचं खाते अन्यायकारकपणे Negative होऊ नये

दंड वाजवी आणि स्पष्ट असावा

सध्या Metro, Urban, Semi-Urban आणि Rural भागांनुसार वेगवेगळे नियम आहेत. पण ग्राहकांसाठी अधिक न्याय्य पद्धती आणण्यावर भर दिला जात आहे.

  1. Loan Apps आता तुमची संपूर्ण माहिती घेऊ शकणार नाहीत

डिजिटल कर्ज देणाऱ्या अनेक Apps कडून ग्राहकांच्या डेटाचा गैरवापर झाल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

काही Apps:

Contacts

Photos

Call Logs

Gallery Access

मागून लोकांना त्रास देत असल्याचे आरोप झाले होते.

यावर RBI ने Digital Lending Guidelines अंतर्गत कडक नियम लागू केले आहेत.

आता:

ग्राहकाची स्पष्ट परवानगी आवश्यक असेल

अनावश्यक Permissions वर निर्बंध येतील

नियमनबद्ध संस्थांची जबाबदारी वाढेल

जर एखादे Loan App जबरदस्तीने Contact किंवा Gallery Access मागत असेल, तर सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

ग्राहकांसाठी याचा अर्थ काय?

EMI भरत असाल

ATM वापरत असाल

UPI Payment करत असाल

Mobile Banking वापरत असाल

Loan Apps वापरत असाल

तर 2026 मधील RBI चे हे बदल बँकिंग सुरक्षितता, पारदर्शक आणि ग्राहक-केंद्रित बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button