breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

गायिका शाल्मली खोलगडे अडकली विवाह बंधनात

मुंबई – आपल्या आवाजाने संपूर्ण बॉलिवूडला वेड लावणारी लोकप्रिय गायिका शाल्मली खोलगडे नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. शाल्मलीने तिचा बॉयफ्रेण्ड फरहान शेखसोबत लग्नगाठ बांधली. २२ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात छोटेखानी पद्धतीने हा सोहळा पार पडला. या जोडप्याने त्यांचं लग्न अतिशय गुप्त ठेवलं होतं. परंतु आता येत्या १ डिसेंबरला शाल्मली आणि फरहान यांच्या लग्नाचं रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे. या समारंभाला सगळ्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला आमंत्रित करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. लग्नात त्यांनी अतिशय साधे पोशाख परिधान केले होते. तर, त्यांच्या वरमालादेखील हटके होत्या. यात कागदी फुलांसह चक्क त्यांचे काही फोटो गुंफलेले होते.

शाल्मली आणि फरहान सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर सहा वर्षांनंतर त्यांनी लग्न केलं आहे. फरहान हा मुंबईत मिक्सिंग आणि मास्टरींग इंजिनिअर म्हणून काम करतो. तर शाल्मालीने ‘परेशान’ (इशकजादे), ‘दारू देसी’ (कॉकटेल) आणि ‘बलम पिचकारी’ (ये जवानी है दिवानी) यांसारखी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. तिने म्युझिक रियालिटी शो ‘इंडियन आयडॉल ज्युनियर’ आणि ‘सूर नवा ध्यास नवा’ यांत परीक्षकपदाची धुराही सांभाळली होती.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button