ताज्या घडामोडीराष्ट्रिय

हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी, पर्यटकांसाठी ठरतेय पर्वणी

हिमाचल प्रदेशमधील अनेक ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे .येथील स्थानिक लोक आणि पर्यटकांना बर्फवृष्टीचा सामना करावा लागतोय. हिमाचल प्रदेशमधील अनेक ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी झाली आहे.

या जोरदार बर्फवृष्टीमुळे पर्यटक ठिक-ठिकाणी अडकून पडले आहेत. आणखी काही दिवस अशीच बर्फवृष्टी सुरूच राहील असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येतो आहे. समुद्रसपाटीपासून दहा हजार उंचीवर असणाऱ्या हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये देखील बर्फवृष्टी सुरू आहे. मंडीमधला कामरुनाथ तलाव देखील गोठला आहे. बर्फवृष्टीमुळे येथील वातावरण बदलून गेलंय. त्यामुळे येथील पर्यटकांना एक वेगळेच चित्र अनुभवायला मिळत आहे.

ही बर्फवृष्टी पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहे.वातावरणातील बदल, बर्फवृष्टी अशी एकंदर परिस्थिती पाहता सध्याच्या घडीला येथील प्रशासनाकडून स्थानिकांसोबतच पर्यटकांनाही सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button