ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लघुफिल्म, गीत, पोस्टर/चित्रकला व पथनाट्य स्पर्धा

पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे स्वच्छ महाराष्ट्र / भारत अभियान अंतर्गत लघुफिल्म (Short film ), गीत (Jingle ), पोस्टर/ चित्रकला, शिल्प/भित्तीचित्र (mural) व पथनाट्य (Street Play) स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धेसाठी प्लास्टीक बंदी, कचरा विलगीकरण, परिसर स्वच्छता, 3R- Reduce, Reuse, Recycle (कमी वापर, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण) हे विषय असणार आहेत.स्वच्छ महाराष्ट्र/ भारत अभियान (नागरी) अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2022 सुरु झालेले आहे. अभियानामध्ये नागरीकांचा व समाजातील सर्व घटकांचा व्यापक स्वरुपात सहभाग असणे तसेच माहिती, शिक्षण व संवादाद्वारे वर्तनामध्ये बदल घडविणे, हा या स्पर्धेचा प्रमुख हेतू आहे.

– ही स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली आहे.

– स्पर्धेतील कलेमध्ये पिंपरी चिंचवड शहराचे नाव येणे अनिवार्य आहे.

– स्पर्धकांची नाव, संपर्क क्रमांक, वॉर्ड क्रमांक, ई-मेल, स्पर्धेचे नाव, स्पर्धेचा विषय इ. माहिती देण्यात यावी.

स्पर्धकांतून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी शुक्रवार दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत सकाळी 10 वाजेपर्यंत [email protected] वर आपली कला ई-मेल करावी असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button