….तर शहरातील सर्व कुत्र्यांना वाघासारखा रंग देण्यात यावा – माधव पाटील
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरात सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडांना रंगरंगोटी सुरू आहे. प्रत्येक झाडाच्या सभोवती किमान 50 जीवांचे अस्तित्व असते. त्या जीवांना या रंगामुळे धोका निर्माण होऊ शकतो. सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडांचा सन्मान हिरावून घेऊ नका. झाडांची रंगरंगोटी तत्काळ थांबवा,तसेच झाडांची रंगरंगोटी चुकीची वाटत नसेल तर शहरातील सर्व कुत्र्यांना वाघासारखा रंग देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे शहराध्यक्ष माधव धनवे-पाटील यांनी केली.
याबाबत महापौर उषा ढोरे यांना निवेदन दिले. त्यात धनवे-पाटील यांनी म्हटले आहे की, झाडांची रंगरंगोटी चुकीची आहे. या रंगामुळे झाडा सभोवतालच्या 50 जीवांना धोका निर्माण होऊ शकतो. झाडांची रंगरंगोटी चुकीची वाटत नसेल तर शहरातील सर्व कुत्र्यांना वाघासारखा रंग देण्यात यावा, अशी उपरोधिक मागणी त्यांनी केली.
पर्यावरणाचे रक्षण व्हावे. झाडांना सन्मान मिळावा. यासाठी तत्काळ सुशोभीकरणाच्या नालाखाली सुरु असलेले झाडांची रंगरंगोटी थांबवावी अशी मागणी त्यांनी केली. यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच ही रंगरंगोटी थांबवण्यात येईल असे आश्वासन महापौर ढोरे यांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले.