breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: शिवसेनेच्या महापौरांनीच केलं नियमांच उल्लंघन, महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी करू नका, ठरलेले कार्यक्रम रद्द करा किंवा पुढे ढकला, अशा सूचना मुख्यमंत्री वारंवार करत आहेत. असे असतानाही मात्र शिवसेनेच्या महापौरांनीच ही सुचना डावलल्याचं समोर आहे..डोंबिवलीत १९ मार्च रोजी झालेल्या एका लग्नात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे यांनी आपल्या पतीसह हजेरी लावली.

लग्नाला आणि हळदी समारंभाला उपस्थित असलेल्या नवऱ्याच्या घरातील तरुणाला करोनाची लागण झाल्यानंतर त्याच लग्नात असलेली एक तरुणीही करोनाबाधीत झाली आहे. यामुळेच लग्नाला उपस्थित असलेल्या सर्वांनाच होम क्वारंटाइनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केडीएमसीच्या महापौर विनिता राणे यांनाही १४ दिवस विलगीकरणात राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

तुर्कीहून डोंबिवलीत आलेल्या आणि भावाच्या लग्नाला हजेरी लावलेल्या तरुणाला करोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने या भागाची पाहणी करून लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांना तपासणीसाठी पाठवले होते. या तरुणाच्या घरातील तिघांचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरीही त्यांना विलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर धास्तावलेल्या लग्नातील वऱ्हाडींकडून त्यांचीही तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

या लग्नसमारंभाला उपस्थित असणाऱ्या एका तरुणीलाही करोनाची बाधा झाल्याचं निदान झाल्यानंतर लग्न आणि हळदीला उपस्थित असणाऱ्या सर्व वऱ्हाडींना विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.माजी नगरसेविकेच्या मुलाच्या या लग्नाला महापौरांसह आणखी काही नगरसेवकांनीही हजेरी लावली होती. त्यांची नावे आरोग्य विभागाकडे आलेली नसली तरी सामाजिक जबाबदारी ओळखून प्रत्येकाने स्वतःला होम क्वारन्टाइन करून घ्यावे, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button