breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी-भाजपला २०२४ ची स्थिती अनुकूल नाही’; शरद पवारांचा दावा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त बैठक झाली. यानंतर शरद पवार हे सत्तेत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, यावरून शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले, अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आम्ही राजकीय चर्चा केलीच नाही. माझ्याशी कोण चर्चा करणार आहे. ज्या पक्षात हे सर्व नेते होते त्या पक्षाचा संस्थापक कोण आहे. त्या पक्षाचा वरिष्ठ व्यक्ती कोण आहे. यात आणखी कुणी चर्चा करायला येईल असं म्हणण्याचं काही कारण नाही. त्याला कुणीही महत्त्व देण्याचं काहीही कारण नाही.

हेही वाचा – ‘देशाच्या विकासामध्ये गोरगरीब कष्टकरी रिक्षा चालकांचाही वाटा हवा’; बाबा कांबळे

अजूनही माझ्या राजकीय निवृत्तीची वेळ जवळ आलेली नाही, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी विरोधकांना दिले. आम्ही सर्वांनी मिळून इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. आम्हाला बदल हवा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला २०२४ मधील स्थिती अनुकूल नसल्याचा दावा त्यांनी केला, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांनी मोदींविरोधात लढण्याची भूमिका स्पष्ट करावी, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. यावरून शरद पवार म्हणाले, मी माझ्या पत्रकार परिषदेत सुरूवातीलाच मोदींचं गुणगान गायलं आहे का? माझं म्हणणं सर्वांनी ऐकलं आहे, असं शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button